Sangola : हैदराबाद येथून खगोलशास्त्र अभ्यासासाठी काल (29 मार्च) रात्री सोडण्यात आलेला टेलिस्कोप आणि पॅराशुट आज पहाटे हवेच्या दाबामुळे भरकटून सांगोला शहरातील खडतरे गल्लीत कोसळले. काल (29 मार्च) रात्री हैदराबाद येथून एक टन वजनाचा टेलिस्कोप आणि यंत्रणा व अर्धा टन वजनाचे दोन पॅराशुट सोडण्यात आले होते. ही यंत्रणा अवकाशात जवळपास 32 किलोमीटर उंचीवरून निरीक्षणे नोंदवत होती. रात्री उशिरा ही निरीक्षणे नोंदविण्याचे काम संपल्यावर ही यंत्रणा हैदराबादच्या परिसरातच उतरणे अपेक्षित असताना हवेच्या प्रेशरमुळे आंध्रप्रदेश ओलांडून महाराष्ट्रातील सांगोला शहरात कोसळली.
वाहनांचेही मोठं नुकसान, सुदैवाने मनुष्यहानी टळली
यातील पहिले पॅराशुट हे शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खारटवाडी येथे पडले, तर टेलिस्कोप आणि पॅराशुट ही यंत्रणा सांगोला शहरातील खडतरे गल्लीत कोसळली. आज (30 मार्च) पहाटेच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्याने कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी एक कार, एक दुचाकी आणि एका टेम्पोचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. ही यंत्रणा भरकटल्याचे टाटा संशोधन केंद्राला समजल्यानंतर त्यांची टीम शोधत सांगोल्यापर्यंत पोचली आहे. अचानक आलेल्या हवेच्या प्रेशर मुळेच ही यंत्रणा भरकटली आणि इतक्या लांब वर येऊन कोसळल्याचा दावा टाटा संशोधन केंद्राचे सतीश पुजारी यांनी ABP माझाशी बोलताना केला आहे.
केडीएमसीच्या शाळांमधून होतेय सौरउर्जा निर्मिती, आयुक्तांच्या हस्ते शुभारंभ
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळांचा चेहरा मोहरा बदलत असतानाच आता पालिकेच्या याच शाळा सौरउर्जा निर्मितीची नवी केंद्र म्हणून उदयाला येत आहेत. डोंबिवलीच्या पाथर्ली येथील आचार्य भिसे गुरुजी ही 62 क्रमांकाची शाळा आता पहिली सोलर शाळा म्हणून ओळखली जाणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्या हस्ते या शाळेतील सौरउर्जा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.
केडीएमसीच्या विद्युत विभागातर्फे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीएसआर फंडाच्या माध्यमातून सौर उर्जा प्रकल्प बसविण्यात येत आहेत. याची सुरुवात पाथर्लीच्या आचार्य भिसे गुरुजी शाळेपासून करण्यात आली. या शाळेमध्ये चार किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यामुळे पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारी ही कल्याण डोंबिवलीतील पहिली शाळा ठरली असून केडीएमसी आयुक्त डॉ. जाखड यांच्या हस्ते हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या