मुंबई : ZTE ने आपला नवा स्मार्टफोन ZTE नूबिया Z11 चीनमध्ये लाँच केला आहे. नूबिया Z11चिनी बाजारात गोल्ड, ग्रे आणि सिलव्हर रंगाच्या वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोअरेजच्या वेरिएंटची किंमत 2,499 युआन (भारतीय चलनानुसार 24000 रुपये) तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबीच्या वेरिएंटची किंमत 3400 युआन (36000 रुपये) आहे.
या फोनसाठी नोंदणी चीनमध्ये सुरु झाली आहे. ZTE नूबिया Z11 या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाचा डिस्प्ले असून त्याची रिझॉल्यूशन कपॅसिटी 1920X1080 पिक्स्ल आहे. तसेच 2.15GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 64बीटचा क्वाड-कोअर प्रोसेसर आहे. ग्राफिक्ससाठी एड्रेनो 530 जीपीयू आहेत. फोनमध्ये रिअर फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच ZTE नूबिया Z11मध्ये 4 जीबी आणि 6 जीबी रॅम सोबत 64 जीबी व 128 जीबी स्टोअरेज वेरिएंट मिळेल. याची मेमरी 200 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन हायब्रिड ड्यूएल सिम सपोर्टसोबतच दोन सिम किंवा एक सिम आणि एक मायक्रोएसडी कार्डचा पर्याय देण्यात आला आहे.
या फोनमध्ये ड्यूअल टोन एलईडी फ्लॅश, अपर्चर एफ 2.0 आणि 6 पी लेंससोबत 16 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 5P लेंस, अपर्चर एफ 2.4 आणि 80 डिग्री वाइड एंगल लेंससोबत 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनला बॅटरी बॅकअपसाठी 3000mAhची बॅटरी देण्यात आली आहे. जे क्विक चार्जीस लेंस आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 4G, वायफाय 802.11, ब्लयूटूथ 4.1GPRS, यूएसबी टाइप-सी आणि NFC सारखे फिचर देण्यात आला आहेत.