Zoom CEO tweets wrong map of India: केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (India It Minister Rajeev Chandrasekhar) यांनी अलीकडेच व्हिडीओ कॉलिंग कंपनी झूमचे (Zoom App) संस्थापक आणि सीईओ इरिक युआन (Zoom Ceo Eric Yuan) यांना ट्विटमध्ये (Twitter) भारताचा चुकीचा नकाशा (India Map) दाखवल्याबद्दल झापलं आहे. ट्वीट करून युआनने जगभरातील प्रत्येक देशातील टॉप व्हिडीओ कॉलिंग प्लॅटफॉर्म दाखवलं होतं, मात्र असं करत असताना त्यांच्याकडून ही मोठी चूक झालेली आहे.
 
या व्हिडीओमध्ये भारताचा चुकीचा नकाशा (India Map) होता. ज्यामध्ये जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) केंद्रशासित प्रदेश दाखवण्यात आलेला नाही. या ट्विटनंतर राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि नेटकऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. युआन यांना टॅग करताना ते म्हणाले की, सीईओंनी वापरत असलेल्या नकाशांबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ते ट्वीट करता म्हणाले की, ''आपण याची खात्री करणे आवश्यक आहे की, तुम्ही ज्या देशांसह व्यवसाय करता, त्या देशांचा योग्य नकाशा वापरा @ericsyuan.''






झूमच्या सीईओने दिले 'हे' उत्तर 


राज्यमंत्री चंद्रशेखर (India It Minister Rajeev Chandrasekhar) यांच्या ट्विटनंतर झूमचे (Zoom App) सीईओ इरिक युआन (Zoom Ceo Eric Yuan)  यांनी त्यांचे ट्वीट डिलीट केले. यासोबतच आयटी मंत्री आणि त्यांची चूक निदर्शनास आणणाऱ्या इतरांचे आभार मानत त्यांनी लिहिले की, 'मी नुकतेच एक ट्वीट काढून टाकले आहे, ज्यामध्ये तुमच्यापैकी अनेकांनी सांगितले होते की, त्याच्या नकाशात चूक आहे. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद'. यावर उत्तर देताना चंद्रशेखर यांनी हात जोडलेल्या इमोजीसह युआन यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे.






यापूर्वीही अनेक कंपन्यांकडून भारताच्या नकाशाबाबत चुका झाल्या आहेत, मात्र चुकीचा नकाशा (India Map) वापरल्यामुळे एखादी कंपनी अडचणीत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी असे नकाशे वापरले आहेत, ज्यात केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) आणि लडाखचा (Ladakh) भाग दाखवला नव्हता. दरम्यान, भारताचा नकाशा (India Map) चुकीचा दाखवणे हा दंडनीय गुन्हा आहे आणि तसे केल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.