असूस झेनफोन 3च्या तीन मॉडेल्सचं आज लाँचिंग!
एबीपी माझा वेब टीम | 30 May 2016 05:23 AM (IST)
मुंबई: स्मार्टफोन निर्मिती करणारी तैवानी कंपनी असूस, आज तीन नवे मॉडेल्स लाँच करणार आहे. असूसचे हे तीनही स्मार्टफोन झेनफोन 3 सीरिजमधील असतील. असूस झेनफोन 3, असूस झेनफोन 3 मॅक्स आणि असूस झेनफोन 3 डिलक्स अशी या तीन स्मार्टफोनची नावे आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेअकरा वाजता या तीनही झेनफोनचं लाँचिंग होईल. या तीनही नव्या मॉडेल्समध्ये सी टाईप यूएसबी पोर्ट, फिंगरप्रिंट स्कॅनर आणि संपूर्ण मेटल फ्रेम ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. साधारणपणे महिनाभरापूर्वी लिक झालेल्या माहितीनुसार, झेनफोन 3 मध्ये कॉडकोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम असेल तर अँड्राईडची सर्वात लेटेस्ट ओएस मार्शमेलो 6.0 ने सज्ज असेल. त्याशिवाय फुल एचडी डिस्प्ले आणि 23 मेगापिक्सलचा मुख्य म्हणजे रिअर कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी असलेला फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा असेल. महिनाभरापूर्वी बेंचमार्क लिस्टिंगमध्ये असूस झेनफोन 3 चा तपशील लीक झाला होता. आज रीलिज होऊ घातलेल्या अन्य दोन झेनफोन 3 च्या मॉडेल्सपैकी एक स्मार्टफोन 5.9 इंच एचडी डिस्प्ले असलेला आहे. त्यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615 हा प्रोसेसर तर 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट मेमरी असणार आहे. या स्मार्टफोनचा मुख्य कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा तर सेल्फी कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा आहे. तर दुसरा स्मार्टफोन 5.5 इंच फुल एचडी डिस्प्ले आणि हेक्साकोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसर ने सज्ज आहे. या झेनफोनची रॅम 3 जीबी तर इनबिल्ट मेमरी 32 जीबी आहे.