Elon Musk Tweet : जगातील श्रीमंत व्यक्ती, टेस्ला (Tesla) आणि आता ट्विटरचे (Twitter) मालक एलॉन मस्क (Elon Musk) नेहमी त्यांच्या ट्वीटमुळे चर्चेत असतात. मस्क काही ना काही ट्वीट करत असतात. या ट्विटवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत असतात. त्यावर मस्कही पुन्ही रिट्वीट करतात. मस्क यांचे अनेक ट्वीट यांमुळे चर्चेत असतात. सध्या मस्क यांचं एक ट्वीट आणि त्यावरील युपी पोलिसांचं ट्वीट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. युपी पोलिसांनी एलॉन मस्क यांच्या ट्विटला भन्नाट उत्तर दिलं आहे. हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
युपी पोलिसांचं एलॉन मस्क यांना भन्नाट उत्तर
एलॉन मस्क यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केलं होतं. या ट्विटमध्ये एलॉन मस्क यांनी लिहिलं होतं की, 'मी ट्विट केल्यावर माझ्या ट्वीटची गिनती माझ्या कामामध्ये केली जाते का?' या ट्वीटवर युपी पोलिसांनी त्यांच्या अंदाजात केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आहे. मस्क यांच्या ट्वीटवर युपी पोलिसांनी ट्वीट करत म्हटलं की, 'जर युपी पोलिसांनी तुमची तक्रार ट्विटरवर सोडवली, तर हे काम मानलं जाईल का?' यानंतर युपी पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून या ट्वीटचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. त्यावर 'होय, हे काम मानलं जाईल.', असंही लिहिलं आहे. त्यामुळे युपी पोलिसांचं हे ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहे.
ट्विटरवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून काही ना काही ट्वीट करत असतात. असंच एक ट्वीट मस्क यांनी केलं होतं. यामध्ये त्यांनी विचारलं की, 'मी ट्विी केल्यावर ते माझं काम समजलं जातं का?' या ट्विटवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एलॉन मस्क यांनी अलिकडेच ट्विटर कंपनी विकत घेतली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मस्क आणि ट्विटर यांच्यातील ही डील चर्चेत होती. मस्क यांनी 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर कंपनी विकत घेतली. तेव्हापासून मस्क यांनी ट्विटर कंपनीत अनेक बदल केले आहेत. ट्विटरमधून अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं. ट्विटरने पेड ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा सुरु करण्याचाही निर्णय घेतला. शिवाय अलिकडेच ट्विटर अकाऊंट तीन रंगात व्हेरिफाईड होणार असल्याची माहिती मस्क यांनी दिली आहे. यापुढे ट्विटर अकाऊंट निळा, सोनेरी, राखाडी रंगांच्या व्हेरिफाईड टिक ट्वीटर अकाऊंटला देण्यात येणार असल्याचं मस्क यांनी सांगितलं.