नवी दिल्ली : ट्विटरने आपलं बहुप्रतिक्षित लाईव्ह स्ट्रिमिंग फीचर भारतात लाँच केलं आहे. यामुळे युझर्सना कार्यक्रम, बर्थ डे सेलिब्रेशन किंवा इतर अनुभव ट्विटरवर लाईव्ह शेअर करता येणार आहेत.  ट्विटरचे सीईओ जॅक डोरसे यांनी याबाबत माहिती दिली आहे.


यापूर्वी फेसबुकने लाईव्ह स्ट्रिमिंग फीचर लाँच केलं होतं. त्यानंतर ट्विटरने ट्विटर लाईव्हची घोषणा केल्यानंतर युझर्सना या फीचरची अनेक दिवसांपासून उत्सुकता होती.

लाईव्ह कसं करणार?

ट्विटरने नुकतीच जारी केलेली अपडेट तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये असणं आवश्यक आहे. कंपोज मेसेज या पर्यायामध्ये गेल्यानंतर कॅमेरा ऑप्शनमध्येच लाईव्ह स्ट्रिमिंगचा पर्याय दिलेला आहे.

लाईव्ह स्ट्रिमिंग पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला कॅप्शन द्यावं लागेल. कॅप्शन दिल्यानंतर तुम्ही गो लाईव्ह या पर्यायावर क्लिक करुन लाईव्ह करु शकता.