| मॉडेल | व्हेरिएंट | जीएसटीआधी कारची किंमत | जीएसटीनंतर कारची किंमत |
| टाटा टियागो | एक्सबी पेट्रोल | 3.54 लाख रुपये | 3.26 लाख रुपये |
| एक्सझेड डिझेल | 6.23 लाख रुपये | 5.71 लाख रुपये |
जीएसटीनंतर टाटा टियागो कार स्वस्त
एबीपी माझा वेब टीम | 17 Jul 2017 03:37 PM (IST)
टाटानं नुकतीच लाँच केलेली टियागो कार आता आणखी स्वस्त झाली आहे. आकर्षक डिझाइन आणि कमी किंमत यामुळे या कारच्या विक्रीत वाढ झाल्याचं समजतं आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर ही कार आणखी स्वस्त झाली आहे.
मुंबई: टाटानं नुकतीच लाँच केलेली टियागो कार आता आणखी स्वस्त झाली आहे. आकर्षक डिझाइन आणि कमी किंमत यामुळे या कारच्या विक्रीत वाढ झाल्याचं समजतं आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर ही कार आणखी स्वस्त झाली आहे.
वर दिलेल्या कारच्या किंमती या मुंबईतील आहे. यामध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर 28,000 आणि 52,000 रुपयांनी दोन्ही मॉडेल स्वस्त होणार आहेत. टाटा टियागोचं पेट्रोल मॉडेल 3.26 लाखांना उपलब्ध आहे तर डिझेल मॉडेल 5.71 लाख (एक्स शोरुम) आहे. टियागोमध्ये पेट्रोल आणि डिझेल हे दोन्ही मॉडेल असून पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1.2 लीटर रेवोट्रॉन इंजिन आहे. तर डिझेल व्हेरिएंटमध्ये 1.05 लीटर इंजिन आहे. तसेच यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तसेच ऑटोमेटेड ऑप्शनही आहे. या कारची मारुतीच्या सेलेरिओशी आहे. स्टोरी सौजन्य : cardekho.com