मुंबई : शेअरइट या चिनी कंटेट शेअरिंग अॅपच्या भारतातील मुख्यालयाची दिल्लीतील गुरुग्राममध्ये स्थापना करण्यात येणार आहे. शनिवारी याबाबत शेअरइट अॅपच्या कंपनीकडून माहिती देण्यात आली. स्मार्टफोन आणि टॅब्लेटवर फोटो, व्हिडीओ, म्युझिक, कॉन्टॅक्ट्स, अॅप्स किंवा इतर फाईल्स ट्रान्स्फर करण्यासाठी शेअरइटचा वापर केला जातो.


शेअरइट अॅपच्या माध्यमातून दररोज 15 कोटीहून अधिक फाईल्स ट्रान्स्फर केल्या जातात.

शेअरइटचे वितरण संचालक शियाओले दू यांच्या माहितीनुसार, भारतातील शेअरइटच्या यूझर्सची संख्या लक्षात घेऊन भारतात मुख्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, जागतिक स्तरावर शेअरइटकडून ज्या योजना राबवल्या जातात, त्यांचा भारतीय यूझर्सना फायदा देण्याचा प्रयत्न आहे.

गुरुग्राममध्ये शेअरइटचं भारतातील पहिलं मुख्यालय उघडण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे, अशी घोषणा बंगळुरुमधील 'शेअरइट कॅम्पस मीट-अप' दरम्यान कंपनीकडून करण्यात आली.