मुंबई: रेनॉल्टच्या एक हजार सीसी इंजिन क्षमतेच्या क्विड कारची बुकींग सुरु झाली आहे. पॉवरफुल क्विड या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईत या कारची बुकींग सुरु झाली आहे. अवघ्या 10,000 ही कार बुक करता येणार आहे. पण या कारसाठी 3 महिने थांबावं लागणार आहे.

 

सुत्रांच्या मते, या नव्या क्विडच्या बेस व्हेरिएंटची किंमत 4 लाख रुपये (ऑन रोड) आहे. तर याच्या टॉप मॉडेलची किंमत 4.5 लाख रुपये (ऑन रोड) आहे.

 

पॉवरफुल क्विड कारमध्ये 10 लिटर क्षमतेचं इंजिन देण्यात आलं  आहे. याच्या इतर फिचर्सबद्दल सध्या खुलासा करण्यात आलेला नाही. पॉवरफुल इंजिनसह यामध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देखील मिळू शकतं. लाँचिंगनंतर या कारची स्पर्धा ऑल्टो के-10सोबत असणार आहे.