मुंबई : रेनॉल्टनं आपली कॅप्चर ही नवी एसयूव्ही कार लाँच केली आहे. या कारची किंमत 9.99 लाख रुपयांपासून 14.05 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. रेनॉल्टच्या या नव्या कारची स्पर्धा ही ह्युदांईच्या क्रेटा कारशी असणार आहे.
रेनॉल्टनं कॅप्चर कार ही पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनमध्ये लाँच केली आहे. पाहा या दोन्ही व्हेरिएंटची किंमत किती.



  • पेट्रोल व्हेरिएंट आणि किंमत



  • आरएक्सई : 9.99 लाख रुपये

  • आरएक्सएल : 11.07 लाख रुपये

  • आरएक्सटी : 11.69 लाख रुपये

  • आरएक्सटी (ड्यूल-टोन) : 11.86 लाख रुपये


 

  • डिझेल व्हेरिएंट आणि किंमत



  • आरएक्सई : 11.39 लाख रुपये

  • आरएक्सएल : 12.47 लाख रुपये

  • आरएक्सटी : 13.09 लाख रुपये

  • आरएक्सटी (ड्यूल-टोन) : 13.26 लाख रुपये

  • प्लेटिन : 13.88 लाख रुपये

  • प्लेटिन (ड्यूल-टोन) : 14.05 लाख रुपये


 



पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1.5 लीटर इंजिन असून यामध्ये 106 पीएस पॉवर आणि 142 एनएम टॉर्क आहे. तर डिझेल व्हेरिएंटमध्ये 1.5 लीटरचं इंजिन असून 110 पीएस आण 240 एनएम टॉर्क आहे.

बातमी सौजन्य : cardekho.com