मुंबई : रिलायन्स जिओचा मच अवेटेड व्हॉईस कमांडिंग 4G फीचर फोन लाँच करण्यात आला आहे. वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी या फोनची घोषणा केली. 24 ऑगस्टपासून या फोनची प्री बुकिंग करता येणार आहे.  याशिवाय अंबानींनी मोस्ट अवेटेड सर्व्हिस FTTH ब्रॉडबँडबाबतही मोठी घोषणा केली.

हायस्पीड ब्रॉडबँडवर जिओचं काम सुरु आहे, जी लवकरच लाँच केली जाईल. फिक्स लाईन हायस्पीड इंटरनेटमुळे देशाच्या प्रगतीला आणखी वेग येईल. जिओकडून कार्यालये, व्यवसाय आणि वैयक्तिक वापरासाठी जागतिक दर्जाची फायबर कनेक्टिव्हीटी दिली जाईल. हे जिओचं पुढचं पाऊल असेल, अशी माहिती अंबानींनी दिली.

जिओच्या फायबर टू द होम म्हणजेच FTTH या सर्व्हिची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये या सेवेची चाचणीही सुरु केली असल्याची माहिती आहे. शिवाय या सेवेच्या टॅरिफ प्लॅनचीही माहिती समोर आली होती.

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, जिओ फायबर प्रीव्ह्यू ऑफरमध्ये तीन महिन्यांसाठी 100 GB डेटा दिला जाईल, ज्याचं स्पीड 100Mbps असेल. मात्र ग्राहकांना त्यापूर्वी राऊटर इंस्टॉलेशनसाठी 4500 रुपये भरावे लागतील. हे पैसे रिफंडेबल असतील.100 GB डेटा संपल्यानंतर 1Mbps स्पीड मिळेल.

संबंधित बातमी :

जिओ फोन कसा आहे?


‘डेटागिरी’नंतर डिजीटल फ्रीडम, अंबानींकडून घोषणांचा पाऊस


भरसभेत कोकिलाबेन यांना अश्रू अनावर!


रिलायन्सचा धमाका, फुकटात 4G फोन