जिओ 4G च्या निमित्ताने अंबांनींच्या जुळ्या मुलांचं कॉर्पोरेट जगतात पाऊल
एबीपी माझा वेब टीम | 01 Sep 2016 12:02 PM (IST)
नवी दिल्ली: रिलायन्सने आज टेलिकॉम जगतात जिओ 4G च्या निमित्ताने महाक्रांती आणली आहे. मात्र त्याचवेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी आपल्या जुळ्या मुलांनाही कार्पोरेट जगतात लाँच केलं. मुकेश अंबानींनी 4G च्या निमित्ताने ईशा आणि आकाश या जुळ्या मुलांना कार्पोरेट जगतासमोर आणलं. रिलायन्सच्या जिओ 4G साठी ईशा आणि आकाश यांनी मेहनत घेतल्याचं सांगण्यात येत आहे. रिलायन्सच्या या मेगाप्रोजेक्टच्या मागे ईशा आणि आकाश आहेत. जिओ 4G च्या लाँचिंगवेळी मुकेश अंबानी म्हणाले, "जिओ 4G हे तरुणांचं, तरुणांसाठी, तरुणांनी टाकलेलं पाऊल आहे. या टीमचं नेतृत्त्व ईशा आणि आकाश अंबानी करत आहेत". ईशा आणि आकाश हे ऑक्टोबर 2014 मध्ये जिओ बोर्ड मेंबरचे सदस्य बनले होते. तेव्हापासून हे दोघे जिओ 4G साठी काम करत होते. रिलायन्सच्या जिओ 4G साठी तब्बल 15 हजार कर्मचारी काम करत आहेत. रिलायन्स जिओ 4G हे लवकरच 90 टक्के इंटरनेट युझर्सपर्यंत पोहोचेल असा विश्वास अंबानींनी व्यक्त केला. येल युनिव्हर्सिटीतून पदवी 25 वर्षीय ईशा आणि आकाश अंबानीचा जन्म 1991 मध्ये झाला. ईशाने तीचं पदवीचं शिक्षण 'साऊथ एशियन स्टडीज'मध्ये येल युनिव्हर्सिटीतून पूर्ण केलं आहे. त्यानंतर पिता मुकेश अंबानींनी 2014 मध्ये ईशाला रिलायन्स जिओ 4G च्या बोर्ड मेंबरचं सदस्यपद दिलं. आकाश अंबानीकडे इकॉनॉमिक्सची पदवी आकाश अंबानीनेही उच्च शिक्षण घेतलं आहे. आकाशने ब्राऊन युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्र अर्थात इकॉनॉमिक्सची पदवी मिळवली आहे. त्यानंतर आकाशला मुकेश अंबानींनी रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेल बोर्डचं सदस्यत्व दिलं. रिलायन्स जिओच्या ऑफर्स : *19 रुपयांत एका दिवसाचं इंटरनेट (किती डेटा मिळणार याचा उल्लेख नाही) *999 रुपयात 10 GB डेटा – रात्री अनलिमिटेड 4G *1499 रुपयात 20 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G *2499 रुपयात 35 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G *3999 रुपयात 60 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G *4999 रुपयात 75 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G रिलायन्स जिओ 4G च्या प्लानवर एक नजर