मुंबई : पोर्शनं 911 जीटी 3 ही शानदार कार भारतात लाँच केली आहे. या कारची किंमत 2.31 कोटी रुपये (एक्स-शोरुम) आहे. या कारच्या लूकमध्येही थोडा बदल करण्यात आला आहे.
पोर्श 911 जीटी 3 मध्ये 4.0 लीटरचं फ्लॅट-6 इंजिन लावण्यात आलं आहे. ज्यामध्ये 500 पीएस पॉवर आणि 460 एनएमचं टॉर्क देण्यात आलं आहे. या इंजिनसोबत 6-स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असे दोन्ही व्हेरिएंट उपलब्ध आहेत. या कारचा टॉप स्पीड 318 किमी प्रति तास आहे. तर 100चा स्पीड ही कार अवघ्या 3.4 सेंकदात घेते.
पॉवरफुल इंजिनशिवाय या कारमध्ये रिअर-एक्सल स्टिअरिंग आणि रेसिंग चेसिस देखील देण्यात आलं आहे. तसंच मागील स्पॉइलरदेखील खास पद्धतीनं डिझाइन करण्यात आलं आहे.
या कारमधील अनेक नव्या फीचरमुळे ती अधिक आकर्षक दिसते. त्यामुळे आता या कारला भारतात कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बातमी सौजन्य : cardekho.com