नवी दिल्ली : चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोचा 'Oppo F7' चं डायमंड ब्लॅक कलरमधील नवीन व्हेरिएंट भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आले आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या व्हेरिएंटची किंमत 26 हजार 990 रुपये आहे.


Oppo F7 चे महत्त्वाचे निवडक फीचर्स -


  • ड्युअल सिम स्लॉट

  • 6.23 इंच स्क्रीन (1080x2280 रिझॉल्युशन पिक्सेल)

  • मीडियाटेक हेलियो P60 ऑक्टाकोर प्रोसेसर

  • 4 जीबी आणि 6 जीबी व्हेरिएंट

  • 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

  • 25 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा

  • AI आधारित ब्युटिफिकेशन फीचर

  • 64 जीबी आणि 128 जीबी व्हेरिएंट

  • एसडी कार्डच्या सहाय्याने 256 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा

  • 4G VoLTE, USB OTG, ब्लूटूथ, वाय-फाय आणि फेस अनलॉक इ. फीचर्स


डायमंड ब्लॅक व्हेरिएंटचा लूक या स्मार्टफोचा आकर्षणाचा केंद्र आहे. भारतात ओप्पोच्या सर्वच मोबाईलना चांगला प्रतिसाद पाहायला मिळतो आहे.

फ्रंट फेसिंग कॅमेरा हे ओप्पो कंपनीच्या मुख्य आकर्षणाचा भाग राहिला आहे. त्यामुळे सेल्फी किंग स्मार्टफोन म्हणून ओप्पोकडे तरुणवर्ग पाहतो. आता डायमंड ब्लॅकच्या लूकसोबतच फ्रंट फेसिंग कॅमेरा तब्बल 25 मेगापिक्सेल आहे. त्यामुळे अर्थात लूकसोबतच आता कॅमेराही आकर्षण ठरणार आहे.