मुंबई : मोटोरोला लवकरच G सीरीजच्या नेक्स्ट जनरेशनचे नवे स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. मोटो G6 प्ले, मोटो G6 आणि मोटो G6 प्लस या वर्षी लाँच करु शकतात.


सध्या मोटो G6 प्ले स्मार्टफोनचा एक व्हिडीओ लीक झाला आहे. त्यामुळे याचे फीचरही समोर आले आहेत.

रिपोर्टनुसार, Moto G6 Play मध्ये ऑन स्क्रीन नेव्हीगेशन-की देण्यात आली आहे. तसंच बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे. तसंच एलईडी फ्लॅशसोबत रिअर कॅमेराही आहे. तर फ्रंट कॅमेऱ्यासोबत एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. यामध्ये 12 मेगापिक्सल रिअर आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असू शकतो.

Moto G6 Play मध्ये 18:9 रेशिओसोबत 5.7 इंच HD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यामध्ये 2जीबी / 3 जीबी रॅम आणि 16 जीबी / 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्याची शक्यता आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर असू शकतो.

याशिवाय यामध्ये 4000 mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन अँड्रॉईड 8.0 ओरिओवर आधारित असण्याची शक्यता आहे.