मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोलानं आपले दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. मोटो Z2 प्ले आणि Z2 फोर्स नंतर आपले G5S आणि G5S प्लस हे दोन नवे फोन बाजारात आणले आहेत. या दोन्ही फोनमध्ये अँड्रॉईड नॉगट 7.0 ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. या फोनमध्ये होम बटणावर इंटिग्रेटेड फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.


मोटोच्या G5S स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे, ज्यात 1080x1920 पिक्सेल रिझॉल्यूशन असेल. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम ऑक्टाकोअर प्रोसेसर देण्यात आला आहे, तसंच 3 जीबीची रॅमही देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची इंटर्नल मेमरी 32 जीबी असेल, जी 128 जीबीपर्यंत वाढवता येईल.

G5S मध्ये 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेराही देण्यात आला आहे, तर 5 मेगापिक्सेलचा फ्रंट सेल्फी कॅमेराही या फोनमध्ये असेल. 3000mAh बॅटरी असलेला हा स्मार्टफोन टर्बो चार्जिंगला सपोर्ट करतो.

मोटो G5S प्लसमध्ये 5.5 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. 1080×1920 पिक्सेल रिझॉल्यूशन असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 625 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. G5S प्लसचे दोन व्हेरिएंट मोटोने बाजारात आणले आहेत. 3GB RAM+32GB आणि 4GBRAM+64GB अशा दोन व्हेरिएंटमध्ये हा फोन उपलब्ध असेल.

G5S प्लसमध्ये 13 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर 8 मेगापिक्सेलचा फ्रंट सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. 3000mAh ची दमदार बॅटरीही या मोबाईलमध्ये देण्यात आली आहे.

किंमत मोटो G5S ची किंमत 249 यूरो म्हणजेच जवळपास 18,900 रुपये आणि G5S प्लसची किंमत 299 यूरो म्हणजेच जवळपास 22,700 रुपये ठेवण्यात आली आहे.

मोटोच्या G5S चे फिचर्स

ऑपरेटिंग सिस्टीम : अँड्रॉईड नॉगट 7.0

रॅम : 3 जीबी

प्रोसेसर : क्वालकॉम ऑक्टाकोअर प्रोसेसर

कॅमेरा : 16 मेगापिक्सेल रिअर आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट सेल्फी कॅमेरा

मेमरी : 32 जीबी

मोटो G5S प्लसचे फिचर्स

ऑपरेटिंग सिस्टीम : अँड्रॉईड नॉगट 7.0

रॅम/मेमरी :

3 जीबी/32 जीबी

4 जीबी/ 64 जीबी

प्रोसेसर : 625 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर

कॅमेरा : 13 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट सेल्फी कॅमेरा