मुंबई : भारतीय स्मार्टफोन मेकर कंपनी मायक्रोमॅक्सने दिवाळी सणाआधीच स्मार्टफोनप्रेमींना खुशखबर दिली आहे. मायक्रोमॅक्स कंपनी चार 4 जी स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.


मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक विकास जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या नव्या चारही स्मार्टफोनमध्ये व्हिडीओ कॉलिंग अॅप ‘डिओ’ला प्री-लोड करण्यासाठी गूगलसोबत करार केला केला आहे.

विकास जैन यांनी याबाबत पुढे सांगितले की, “व्हिडीओ कॉलिंग भलेही शहरी फीचर म्हटलं गेलं असेल. पण मायक्रोमॅक्स या फीचरला आमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून देशभरातील सर्व बाजारपेठेत पोहोचवू.”

मायक्रोमॅक्स कंपनीने कमी कालावधीतच स्मार्टफोनप्रेमींच्या मनात आपलं स्थान निश्चित केलं आहे. उत्तम क्वालिटी, उत्तम सर्व्हिस, विविध फीचर्स यांमुळे मायक्रोमॅक्सचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात वापरले जाताना दिसत आहेत. त्यामुळे दिवाळीआधी मायक्रोमॅक्स कोणते चार स्मार्टफोन घेऊन येते, याची उत्सुकता स्मार्टफोनप्रेमींना लागली आहे.