मुंबई : लेनोव्होचा नवा स्मार्टफोन K8 नोट आज भारतात फ्लॅश सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. यासाठी लेनोव्हनं अमेझॉन इंडियासोबत करार केला आहे. आज (शुक्रवार) दुपारी 12 वाजेपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. मागील आठवड्यात लाँच करण्यात आलेल्या K8 नोट स्मार्टफोनच्या 3 जीबी आणि 4 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 12,999 रुपये आणि 13,999 रुपये आहे.


लेनोव्होचा हा पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये ड्युल रिअर कॅमेरा सेटअप आहे.

लेनोव्हो K8 स्मार्टफोनचे खास फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंच स्क्रीन देण्यात आली असून याचं रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल आहे. तसंच याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आली आहे. तर यामध्ये डेका कोअर मीडियाटेक Cortex-A53 प्रोसेसर देण्यात आला आहे.

यात 3 जीबी आणि 4 जीबी रॅमचे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनची मेमरी 128 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. हा स्मार्टफोन अँड्रॉईड नॉगट 7.1 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.

यामध्ये 13 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल ड्युल रिअर कॅमेरा देण्यात आले आहेत. तर 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेराही देण्यात आले आहेत.

या स्मार्टफोनमध्ये 4G VoLTE, वाय-फाय, जीपीएस, ऑडिओ जॅक देण्यात आले आहेत. तसेच याची बॅटरी तब्बल 4000 mAh आहे.

स्पेशल लाँच डे ऑफर

स्मार्टफोनच्या लाँच डे ऑफर्समध्ये मोटोचे हेडफोनवर 900 रुपयांचं डिस्काउंट देण्यात आलं आहे. तर आयडिया यूजर्सनं हा स्मार्टफोन खरेदी केल्यास त्यांना 343 रुपयांच्या रिचार्जवर 64 जीबी 4G डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.