मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 40व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी 4G VoLTE फीचर फोन फुकटात लाँच केला. त्याचवेळी त्यांनी आपल्या कंपनीचा यशस्वी आणि गौरवशाली प्रवास देखील सर्वांसमोर मांडला. यावेळी तिथं उपस्थित असणाऱ्या त्यांच्या आई कोकिलाबेन यांचे डोळे मात्र भरुन आले होते.

कंपनीचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांच्या आठवणींना आणि त्यांच्या संघर्षाला मुकेश अंबानी यांनी उजाळा दिला. त्याचवेळी कोकिलाबेन यांना आपले अश्रू अनावर झाले.


यावेळी बोलताना मुकेश अंबानी यांनी सांगितलं की, 40 वर्षात कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे प्रत्येक अडीच वर्षांनी दुप्पट झाले आहेत. ज्यांनी 1997 मध्ये 1000 रुपये गुंतवले होते. त्यांचे आज 16,54,503 रुपये झाले आहेत. म्हणजेच त्यांना तब्बल 1,600 टक्के नफा झाला आहे.

40 वर्षात रिलायन्सची आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात झाली आहे. यावेळी मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केलं की, 1977 साली कंपनीचा टर्नओव्हर 70 कोटी होता. जो आता 330,000 कोटी एवढा आहे.

कंपनीच्या या यशस्वी कामगिरीबद्दल मुकेश अंबानी बोलत असताना कोकिलाबेन यांना आपले अश्रू अनावर झाले. ऐवढ्या मोठ्या क्षणी धीरुभाईंची आठवण येणं हे साहजिकच आहे. धीरुभाई अंबानी यांनी आपल्या मेहनतीच्या आणि संघर्षाच्या जोरावर रिलायन्सचं विश्व उभारलं होतं. म्हणूनच यावेळी त्यांच्या आठवणीनं कोकिलाबेन यांना आपला हुंदका आवरणं कठीण गेलं!

संबंधित बातम्या:

रिलायन्सचा धमाका, फुकटात 4G फोन

जिओचा फोन कसा आहे, तुमच्या हातात कधी पडणार आणि सुविधा काय?