जयपूर : होंडा मोटर सायकल अँड स्कूटर इंडियाने बुधवारी जयपूरमध्ये ‘CLIQ’ स्कूटर लॉन्च केली. ग्रामीण भागात कमी दरात स्कूटर उपलब्ध करुन देणं, हा या स्कूटरच्या लाँचिंगमागचा उद्देश आहे.

ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठीही होंडाला या स्कूटरची मदत होणार आहे. बसण्यासाठी आरामदायी हे या स्कूटरचं वैशिष्ट्य आहे. दिल्लीतील एक्स शोरुममधील या स्कूटरची किंमत 42 हजार 499 रुपये आहे. शहरांनुसार किंमतीत कमी-जास्त होईल.

रोजच्या वापरासाठी CLIQ स्कूटर उपयोगी असलेली ही स्कूटर होंडाने चार रंगांमध्ये बाजारात आणली आहे.   

CLIQस्कूटरचे फीचर्स :

  • मोबाईल चार्जिंग सॉकेट

  • अंडर सीट स्टोरेज

  • अधिक वजन वाहून नेण्याची क्षमता

  • 110 सीसी इंजिन

  • 8 बीएचपी पॉवर

  • 94 एनएम टॉर्क

  • कॉम्बी ब्रेक सिस्टम

  • प्रति लीटर 60 किमी मायलेज