मुंबई: भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा 70 वा वर्धापन दिन आज देशभर सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. या उत्साहात जगातील  लोकप्रिय सर्च इंजिन गूगलही सहभागी झाले आहे. 70 व्या वर्धापन दिनानिमित्त गूगलने खास डूडल प्रकाशित केले आहे.

 

गूगलच्या डूडलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सांसदेतील ऐतिहासिक भाषणाचे ग्राफिक्स प्रकाशित करण्यात आले आहे. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशाला संबोधित करताना, मध्यरात्रीच्या सर्व जग झोपत असेल. तेव्हा भारत एक नवी सुरुवात करत आहे, असे म्हटले होते.

 

डूडलने ज्या ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली, त्या असेम्बली हॉलच्या बॅकग्राऊंडचा फोटो बनवला असून, त्यातील ग्रीन कारपेटवर भारतीय स्वातंत्र्य दिनाचे साल 1947 नमूद केले आहे.