Dangerous Android Apps: गुगलने (Google) आपल्या प्ले स्टोअरवरून (Play Store) अनेक अँड्रॉइड अ‍ॅप (Android App) काढून टाकले आहेत. हे अ‍ॅप्स युझर्सना चुकीच्या पद्धतीने टार्गेट करत असल्याचा आरोप आहे. यासोबतच चिंतेची बाब म्हणजे लाखो यूजर्सनी हे अ‍ॅप्स आधीच डाउनलोड केले आहेत. हे अ‍ॅप्स जाहिरातींद्वारे यूजर्सना लक्ष्य करण्याचे काम करतात. जर तुम्ही यापैकी कोणतेही अ‍ॅप्सना इन्स्टॉल केले असेल तर तुम्ही ते लगेच काढून टाकावे.


अनेक धोकादायक अ‍ॅप्सबद्दल McAfee चा अहवाल सादर


संगणक सुरक्षा कंपनी McAfee ने Google Play Store वर उपस्थित असलेल्या अनेक धोकादायक अ‍ॅप्सबद्दल एक अहवाल सादर केला आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हे अ‍ॅप्स युजर्सना चुकीच्या पद्धतीने जाहिराती देत ​​होते. हे अ‍ॅप्स युजर्सचा फोन जाहिरातींनी भरतात, त्यानंतर यूजर्सचा फोन हँग होऊन स्लो होतो. मॅकॅफीच्या अहवालानंतर गुगलने गुगल प्ले स्टोअरवरून 13 धोकादायक अँड्रॉइड अ‍ॅप्सवर बंदी घातली असली तरी, हे अ‍ॅप्स अनेक यूजर्सनी डाउनलोड देखील केले आहेत. Google आपल्या Play Store वर सूचीबद्ध करण्यापूर्वी अ‍ॅप्स सुरक्षा तपासते, परंतु बर्याच वेळा असे धोकादायक अ‍ॅप्स सुरक्षा चक्रातून बाहेर पडून Google Play Store वर सूचीबद्ध होतात. त्यानंतर त्यांची ओळख पटवणे कठीण होते. यातील बहुतांश धोकादायक अ‍ॅप्समध्ये जंक क्लीनर अ‍ॅप्सची नावे होती, जे यूजर्सचा फोन चुकीच्या पद्धतीने वापरत होते.


धोकादायक Android अ‍ॅप्सची संपूर्ण यादी
Junk Cleaner - जंक क्लीनर
Full Clean - फुल क्लीनर
Quick Cleaner - क्विक क्लीनर
Keep Clean - कीप क्लीनर
Super Clean - सुपर क्लीन
Cool Clean  - कूल क्लीन
Strong Clean - स्ट्रॉन्ग क्लीन
Meteor Clean - मेटियर क्लीन
Power Doctor  - पॉवर डॉक्टर
Fingertip Cleaner - फिंगरटिप क्लीनर
Windy Clean - विंडी क्लीन
Easy Cleaner - ईजी क्लीनर
Carpet Clean - कारपेट क्लीन