गुगलच्या महत्त्वाकांक्षी स्वयंचलित कार आणि लाईफ सायन्सेस क्षेत्रातील आगामी प्रकल्पांची जबाबदारी आता सुंदर पिचाई यांच्याकडे असणार आहे. गूगलचे सह-संस्थापक लॅरी पेज आणि सेर्गेई ब्रिन हे गुगल आणि अल्फाबेट कंपनीचे अध्यक्ष म्हणून राजीनामा देणार आहेत. दोघांनीही राजीनामा देण्यामागील कौटुंबिक जबाबदारी असल्याचे सांगितले. अल्फाबेट कंपनीमध्ये सुंदर पिचाई सेर्गेई ब्रिन आणि लॅरी पेजची जागा घेतील. अल्फाबेटद्वारे पिचाई दोन्ही कंपन्यांचे काम सांभाळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
2015 साली अल्फाबेटची स्थापना
अल्फाबेट ही कंपनी 2015 साली सर्व कंपन्यांची मूळ कंपनी म्हणून स्थापन करण्यात आली आहे. गुगलपासून वेगळे अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी आणि काही महत्त्वाचे प्रकल्प या कंपनीच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी अल्फाबेटची सुरुवात करण्यात आली. पिचाई आता अल्फाबेट कंपनीच्या मंडाळाचेही सदस्य झाले आहेत. स्वयंचलित कार, लाईफ सायन्सेस, साइड वॉक लॅब्स, बलूनद्वारे ग्रामीण भागात इंटरनेट, अशा गुगलच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर सुंदर पिचाई काम करणार आहेत.
अलफाबेट कंपनी अलिकडच्या वर्षांत जगातील सर्वात मूल्यवान कंपनी बनली आहे. 2018 मध्ये कंपनीचा नफा सुमारे 30 अब्ज होता. तर महसूल 110 अब्ज डॉलर्स होता. पेज आणि सर्जे यांचे म्हणणे आहे की दोन्ही कंपन्या चालविण्यासाठी सुंदर पिचाई यांच्यापेक्षा चांगला माणूस दुसरा कोणी असू शकत नाही. पिचाई हे गेल्या 15 वर्षांपासून आमच्यासोबत काम करत आहेत. सुंदर पिचाई हे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. त्यांचं शिक्षण खरगपूर आयआयटीमधून झालं आहे. त्यांचा जन्म चेन्नईत झाला. सुंदर पिचाई हे 2004 सालापासून गूगलशी जोडले गेले आहेत. पिचाई हे सीईओ या नात्याने गूगलमध्ये प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि टेक्निकल स्ट्रॅटेजीचं दररोजचं काम पाहतात.
संबंधित बातम्या :
आता केवळ 3 दिवसात मोबाईल नंबर होणार पोर्ट
5 मिनिटांत मिळवा 1 लाखांपर्यंतचे कर्ज; शाओमी कंपनीची ऑफर
Mumbai Police | गुन्हेगारांना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांकडे नवं तंत्रज्ञान | ABP Majha