स्टॉकहोम : फेसबुकवर लाईव्ह सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी स्वीडनमध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे. तपासासाठी पोलिसांनी फुटेजची मागणी केली असून ज्या युझर्सकडे या घटनेचे फोटो असतील त्यांनी ते पोलिसांकडे जमा करावेत, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
स्वीडनमध्ये फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून 20 वर्षीय तरुणीवर तिघांनी बलात्कार केला. काही युझर्सने हा व्हिडिओ फेक असल्याचं समजून दुर्लक्ष केलं. मात्र काहींनी घटनेचं गांभीर्य ओळखत तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर फेसबुककडून हे फुटेज हटवण्यात आलं असून संबंधित अकाऊंटही बंद करण्यात आलं आहे.
पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली असून पीडित तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. मात्र या घटनेने जगभरात एकच खळबळ उडाली आहे.