नवी दिल्ली : बीएसएनएल या सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी रक्षाबंधनचं निमित्त साधत जबरदस्त प्लॅन लॉन्च करणार आहे. राखी पे सौगात असं या प्लॅनचं नाव आहे. यात 74 रुपयांमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि त्यासोबत 1 जीबी डेटा मिळणार आहे.


3 ऑगस्टला प्लॅन लॉन्च केला जाईल. त्यानंतर 12 दिवस प्लॅन खरेदी करता येणार आहे. प्लॅनची व्हॅलिडिटी केवळ 5 दिवसांची असेल. कुठल्या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा यात मिळेल.

बीएसएनएलचे संचालक आर. के. मित्तल यांनी याबाबत सांगितले की, सणांचं निमित्त साधत बीएसएनएल अत्यंत स्वस्त ऑफर लॉन्च करत आहे. कंपनीने अनेक कॉम्बो व्हाऊचर बाजारात आणले आहेत, ज्यांमध्ये 18 टक्के अधिक कॉलिंगसोबत 1 जीबी मोफत डेटा मिळेल. यामध्ये 189, 289 णि 389 रुपयांचेही प्लॅन यूझर्स घेऊ शकतात.

रिलायन्स जिओच्या धन धना धन प्लॅननंतर इतर टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा खडबडून जाग्या झाल्या आहेत. त्यामुळे एकामागोमाग एक इतर टेलिकॉम कंपन्याही आपापले प्लॅन स्वस्त करत आहेत.

(नोट : संबंधित ऑफरनुसार रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या नंबरसाठी ही ऑफर आहे किंवा नाही, याची कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन खात्री करा)