नवी दिल्ली: टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम अर्थात बीएसएनएलने नववर्षात खास प्लॅन आणला आहे. 144 रुपयांचा हा प्लॅन आहे. त्यामध्ये तुम्हाला एक महिन्यासाठी कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल करता येतील. इतकंच नाही तर त्यासोबत तुम्हाला 300MB डेटाही मोफत मिळेल.
हा प्लॅन प्रिपेड आणि पोस्पेड अशा दोन्ही ग्राहकांसाठी असेल.
रिलायन्सने जिओ लाँच केल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रात नवी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलनेही नवनवे प्लॅन आणले आहेत.
याबाबत बीएसएनएलचे चेअरमन म्हणाले, "बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी अवघ्या 144 रुपयात अनलिमिटेड कॉलिंग फ्री असेल. कोणत्याही नेटवर्कवर तुम्ही महिनाभरासाठी फ्री कॉलिंग करु शकता. त्यासोबत 300 MB डेटाही मिळेल".
अधिक माहितीसाठी बीएसएनएलच्या वेबसाईटला भेट द्या.