Bajaj Pulsar 250: देशातील आघाडीची दुचाकी निर्माता कंपनी बजाज ऑटोने (Bajaj Auto) त्यांची प्रसिद्ध स्पोर्ट्स बाईक बजाज पल्सर 250 उद्या देशांतर्गत बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही बाईक उद्या म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी पल्सर 250  (Pulsar 250) आणि पल्सर 250 एफ (Pulsar 250F) या दोन प्रकारांसह लॉन्च करण्यात येणार आहे. या दोन्ही बाईक्स नुकत्याच टेस्टिंगदरम्यान स्पॉट करण्यात आल्या होत्या.


प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर दोन्ही बाईक लॉन्च करण्याची तयारी पूर्ण झाली. या बाईक्सचा अलीकडेच एक टीझर प्रदर्शित करण्यात आला. या दोन्ही बाईक्सची डिजाईन पल्सरच्या एसएस 200 शी प्रेरित आहे. सिंगल पॉड हेडलॅम्प क्लस्टर, इंटिग्रेटेड एलईडी डे टाईम रनिंग लाइट्स, मोठे हेडलॅम्प काउल आणि फ्लाय स्क्रीनसह फ्रंटला चांगला लूक मिळू शकतो. स्पाय शॉट्सच्या आधारे असे म्हणता येईल की, कंपनी दोन्ही बाईकच्या इंधन टाकीला मस्क्युलर लूक आणि डिझाइन देत आहे. याशिवाय, समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेन्शन दिले जाईल.


कंपनीने या बाइकमध्ये 249 सीसी क्षमता असलेले सिंगल सिलेंडर ऑइल/एअर-कूल्ड इंजिन देऊ शकते. जे सुमारे 24 बीपीएच पॉवर आणि 20 एनएन टॉर्क जनरेट करते. या बाईक्समध्ये 6 स्पीड गिअरबॉक्ससह देण्यात येण्याची शक्यता आहे. मागील मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, कंपनी यामध्ये व्हेरिएबल वाल्व्ह ऑक्शन तंत्रज्ञान वापरू शकते. या बाईकच्या दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनल एबीएस सिस्टीम देण्यात आली. या बाईकमध्ये इतर फीचर्स प्रमाणे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि मल्टिपल ड्रायव्हिंग मोड दिले जाऊ शकतात.


महत्वाचे म्हणजे, लॉन्चिंगपूर्वी या दोन्ही बाईक्सच्या किंमती विषयी सांगणे कठीण आहे. पल्सर 250 नेकेड मॉडेल 1.35 लाख रुपये तर, सेमी- फेअर मॉडेल 1.45 लाख रुपयांना लॉन्च होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. या दोन्ही बाईकची किंमत शक्य तितकी कमी ठेवण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल.


संबंधित बातम्या-