मुंबई : तैवानमधील प्रसिद्ध टेक कंपनी असूसने भारतात 7th जनरेशन इंटेल प्रोसेसर असलेलं नवीन नोटबुक लॉन्च केलं आहे. 'R558QU' असं या डिव्हाईसचं नाव असून, 'R558QR' या डिव्हाईसचं अपडेटेड व्हर्जन आहे.
असूसने 'R558QU' डिव्हाईसचे दोन व्हर्जन लॉन्च केले आहेत. यामध्ये i7 प्रोसेसर असल्याने या नोटबुकची उत्सुकता वाढली आहे. कोअर i7 प्रोसेसर असलेल्या नोटबुकची किंमत 59 हजार 990 रुपये, तर कोअर i5 प्रोसेसर असलेल्या नोटबुकची किंमत 48 हजार 990 रुपये आहे.
असूस इंडियाचे रिजनल हेड आणि दक्षिण एशिया सिस्टम बिझनेस ग्रुप मॅनेजर पीटर चांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, "असूसच्या नोटबुकची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून वाढत आहे. त्यामुळे यावर्षी नोटबुक निर्मितीवर अधिक भर देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे."
असूस R558QU नोटबुकमध्ये 15.6 इंचाचा एलईडी बॅकलिट एचडी डिस्प्ले आहे. i7 मॉडेलमध्ये 8 जीबी रॅम आणि i5 मॉडेलमध्ये 4 जीबी रॅम देण्यात आला आहे.
दोन्ही मॉडेलमध्ये USV टाईप -c कनेक्टिव्हिटी, एनव्हिडीओ जीफोर्स 940MX (एन16एस-जीटीआर) ग्राफिक कार्ड, एक टीबी 2.5 इंचाचा एचडीडी स्टोरेज, व्हीजीए वेब कॅमेरा, असूस स्मार्ट गेस्चरसोबत कीबोर्ड आणि असूस स्प्लेंडिड सॉफ्टवेअर देण्यात आले आहेत.