मुंबई: मोबाइल कंपनी असुसनं आपला बहुप्रतीक्षित स्मार्टफोन 'जेनफोन AR' 13 जुलैला भारतात लाँच करणार आहे. अससचा हा स्मार्टफोन कंपनीनं CES 2017 मध्ये जगासमोर आणला होता.


ZenFone AR हा अँड्रॉईड 7.0 नॉगट या ऑपरेटिंग सिस्टमवर आधरित असणार आहे. गुगल डेड्रिमच्या मदतीनं या स्मार्टफोनमध्ये काही खास अॅपच्या मदतीनं व्हर्च्युअल रियालिटीचा अनुभव मिळणार आहे. या स्मार्टफोनवर 5.7 इंच स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच याचं रेझ्युलेशन 2560x1440 पिक्सल आहे. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 821 क्वॉड कोअर प्रोसेसर असून तब्बल 8 जीबी रॅमही देण्यात आली आहे.

या स्मार्टफोनमध्ये Vapor Cooling सिस्टमही देण्यात आली असून यामुळे यात हिटींगची समस्या उद्भवणार नसल्याचा कंपनीनं दावा केला आहे.

या स्मार्टफोनमध्ये तब्बल ड्युल कॅमेरा असून यात 23 मेगापिक्सल मेन रिअर कॅमेरा असेल तर दुसरा कॅमेरा 12 मेगापिक्सल असेल तर  8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असणार आहे. दरम्यान, कंपनीनं अद्याप या स्मार्टफोनची किंमत जाहीर केलेली नाही.