'ई-बूक' वाचनाची आवड असणाऱ्यांमध्ये अॅमेझॉनचं 'किंडल' हे डिव्हाइस बरंच लोकप्रिय आहे. नुकतंच अॅमेझॉन किंडलच्या 'Kindle Oasis' चं अपडेटेड व्हर्जन लाँच करण्यात आलं आहे. स्क्रीनचा कलर टेम्परेचर अॅडजस्ट करता येणारं हे नवीन किंडल 19 ऑगस्ट पासून बाजारात उपलब्ध होणार आहे.
Kindle Oasis हे अॅमेझॉन किंडलमधील सर्वात जास्त फिचर्स असलेलं मॉडेल आहे. 2017 मध्ये पहिल्यांदा किंडल ओअॅसिस लाँच करण्यात आले होते. यामध्ये 300ppi पिक्सल डेनसिटी असलेला 7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. Kindle Oasis च्या नवीन मॉडेलमध्ये किंडलच्या स्क्रीनवरील कलर टेम्परेचर अॅडजस्ट करता येणार आहे. बाहेरच्या प्रकाशानुसार स्क्रिनचा कलर टोन 'कुल किंवा वॉर्म' असा बदलता येणार आहे. दिवसाच्या ठराविक वेळेनुसार स्क्रिनची लाईट 'ऑटोमॅटिक अॅडजस्ट' करता येण्याचीही सोय यात देण्यात आलेली आहे.
Kindle Oasis च्या नवीन मॉडेलची विक्री 19 ऑगस्ट पासून सुरु होणार असली तरी सध्या याची प्री-बुकिंग करता येणार आहे. 8 जीबी मेमरी क्षमतेच्या या किंडलची किंमत 21 हजार 999 रुपये इतकी आहे. तर 32 जीबी मेमरी क्षमतेच्या किंडलची किंमत 24 हजरा 999 रुपये आहे. नवीन किंडलसोबत तीन महिन्यांसाठी किंडल अनलिमिटेड ची सेवा मिळणार आहे. तसेच प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी 500 रुपये किंमतीचे एक ई-बुक देण्यात येणार आहे.
'या' खास फिचर्ससह अॅमेझॉनच्या Kindle Oasis चं नवीन मॉडेल लवकरच बाजारात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jun 2019 12:16 PM (IST)
हे नवीन किंडल 19 ऑगस्ट पासून बाजारात उपलब्ध होणार आहे. त्यापूर्वी amazon.in या वेबसाईटवर किंडलची प्री-बुकिंग करता येणार आहे.

Photo by David McNew/Getty Images
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -