अॅमेझॉनकडून डिजिटल प्रिंटिंग सेवा लॉन्च
एबीपी माझा वेब टीम | 25 Sep 2016 10:52 AM (IST)
मुंबई : ऑनलाईन मार्केटिंग कंपनी अॅमेझॉनने शटरफ्लाय नावाने फोटो प्रिंटिंग सेवा सुरु केली आहे. शटरफ्लायच्या माध्यमातून डिजिटल फोटो प्रिंटिंग आणि कस्टमाईझ फोटो बुक्सही तयार करता येतील. फोटो प्रिंट करण्यासाठी ग्राहकांना त्यांचे फोटो अॅमेझानच्या क्लाउड स्टोअरेजवर अपलोड करावे लागतील. आपल्याला हवा तो आकार आणि प्रकार निवडून चेकआऊट करावं लागणार आहे. सध्या ही सेवा नवीन असल्याने वर्षाला जवळपास 800 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. अॅमेझॉनच्या क्लाउडसाठीही ग्राहकांना पैसे द्यावे लागतील. फोटोचा आकार, थीम, पेपरचा प्रकार यावरुन फोटोची किंमत ठरणार आहे. 1 हजार रुपयांपेक्षा जास्तीच्या ऑर्डरवर फ्री शिपिंग दिलं जाणार आहे.