Airtel 5G Network : एअरटेल देशातील 5G क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. या निर्णायामुळे एअरटेल सर्वात वाजवी दरात आपल्या ग्राहकांना 5G सेवा (Airtel 5G Network) ऑफर करण्यास सक्षम ठरणार आहे. भारतात आता वेगवान असं मोबाईल इंटरनेटचं युग सुरू झालं असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एअरटेल  5G प्लसची सेवा  दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसी येथे सुरू झाली आहे. हळूहळू एअरटेल देशातील इतर शहरात एअरटेल 5G सेवेचा विस्तार करेल. 


मार्च 2023 पर्यंत देशातील सर्व प्रमुख शहरात   5G प्लसची सेवा सुरू करण्यात येणार आहे. तुम्ही एअरटेल थँक्स अॅपच्या माध्यमातून तुमच्या शहरात एअरटेल 5G प्लसची सेवा आहे की नाही हे जाणून घेऊ शकता. एअरटेलने घोषणा केली आहे की, एअरटेल 5G प्लसची सेवा आल्यानंतर त्याचा वेग हा सध्याच्या इंटरनेटपेक्षा  20-30 टक्के अधिक असणार आहे. 30 टक्के अधिक पटीने इंटरनेट सेवा मिळाल्यानंतर ग्राहकांना मोठ्या फाईल्स सहज डाऊनलोड करणे शक्य होणार आहे. 


एअरटेल 5G प्लसमुळे हाय क्वालिटी व्हिडीओ, क्लाऊड गेमिंग आणि क्लाऊट कंटेट स्ट्रिमिंग करणे सहज सोपे होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एअरटेलच्या ग्राहकांना आपल्या सध्याच्या डेटा प्लानवर 5G सेवेचा आनंद घेता येणार आहे.  4 जी सीम असलेल्या ग्राहकांना सीम न बदलता 5 जी सेवेचा आनंद घेता येणार आहे फक्त स्पीडसाठी नाहीतर या गोष्टींमुळे  एअरटेल 5G प्लस आहे खास देशातील ग्राहकांना सर्वोत्तम 5G सेवा पुरवण्यासाठी एअरटेल 5G प्लसने एक विशिष्ट तंत्र वापरले आहे. यामध्ये सर्वात अधिक विकसित इकोसिस्टम आणि टेक्नॉलॉजी समावेश केला आहे. त्यामुळे ग्राहक कोणत्या स्मार्टफोनचा वापर करत आहे याचा  5G सेवेवर कोणताही परिणाम होणार आहे. एअरटेल 5G प्लसमुळे शिक्षण, आरोग्य, कृषी आणि लॉजिस्टिक अशा क्षेत्रात माहितीची देवाणघेवाण करण्यास वेग मिळणार आहे. ज्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होणार आहे.
 
एअरटेलचे CEO गोपाल विठ्ठल यांनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितलं की, एअरटेल गेल्या 27 वर्षापासून दूरसंचार क्षेत्रात क्रांती करत आहे. कोणत्याही 5G हँडसेटवर आणि ग्राहकांकडे उपलब्ध असलेल्या सिमवर उपलब्ध असणार आहे.   Airtel 5G Plus  संवाद वाढवणे , ऑफिसचे काम करणे, कनेक्ट करण्यासाठी सज्ज आहे. Airtel 5G Plus लाँच करून 5G तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक मोठा टप्पा गाठला आहे. एअरटेलने या क्षेत्रात अगोदर अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. एअरटेल अशा प्रकारची कामगिरी करणारी भारतातील पहिली कंपनी असणार आहे.


एअरटेलने हैदरबाद येथे आपले पहिले लाईव्ह 5 जी नेटवर्क दिले. तसेच अपोलो हॉस्पिटलसह देशातील पहिल्या 5G कनेक्टेड रुग्णवाहिकेचे अनावरण केले. एअरटेलने भारताचे क्रिकेट ऑयकॉन कपिल देव यांचा भारतातील पहिला 5G संचालिक लाईव्ह होलोग्राम देखील प्रदर्शित केला.  5G स्मार्टफोनवर 1983 सालच्या वर्ल्ड कपच्या कपिल देवच्या 175 नाबाद धावांची खेळी व्हिडीओच्या माध्यमातून दाखवली.  


Airtel 5G Plus सेवा ग्राहकांना कशी घेता येणार?


एअरटेल ग्राहकांना त्यांच्या 4G सिमवर देखील 5G सेवांचा आनंद घेता येणार आहे. जर तुम्हाला  5G सेवांचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी Airtel Thanks अॅप डाऊनलोड करावे. जर तुमचा स्मार्टफोन 5G असेल तर चिंता करण्याची गरज नाही.