नवी दिल्ली : सॅमसंगने नोट सीरिजचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलक्सी नोट 8 भारतात लाँच केला आहे. दिल्लीत मेगा इव्हेंटमध्ये कंपनीने हा फोन लाँच केला. अमेझॉन इंडिया आणि सॅमसंगच्या वेबसाईटवर हा फोन बुक करता येईल. बुकिंगनंतर 21 सप्टेंबरपासूनच फोनची डिलीव्हरी सुरु केली जाणार आहे.


भारतात या फोनची किंमत 67 हजार 900 रुपये ठेवण्यात आली आहे. दरम्यान फोन लाँच होण्यापूर्वीच अडीच लाख ग्राहकांनी या फोनसाठी नोंदणी केली होती. दीड लाख ग्राहकांनी अमेझॉनवर, तर एक लाख ग्राहकांनी सॅमसंगच्या वेबसाईटवर फोन बुक केल्याची माहिती समोर आली होती.

सॅमसंग गॅलक्सी नोट 8 ची विशेषता

  1. ड्युअल रिअर कॅमेरा : गॅलक्सी नोट 8 मध्ये 12 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ड्युअल रिअर कॅमेरापैकी एक 12 मेगापिक्सेलचा वाईड अँगल कॅमेरा आहे, तर दुसरा 12 मेगापिक्सेलचा टेलीफोटो रिअर कॅमेरा आहे.

  2. S पेन : या फोनमध्ये एज टू एज फीचरही देण्यात आलं आहे. त्यासाठी युझर्सना S पेन देण्यात येईल.

  3. स्क्रीन : या फोनमध्ये 6.3 इंच आकाराची  Quad HD+ Super AMOLED(2960×1440 पिक्सेल) (521ppi) इन्फिनिटी स्क्रीन देण्यात आली आहे.

  4. सॅमसंग DeX : यामुळे तुम्ही फोनमध्ये कम्प्युटरचा आनंद घेऊ शकता. फोन DeX ला जोडल्यानंतर फोनमध्ये स्पेशल DeX मोड सुरु होईल. शिवाय एकाच वेळी दोन अॅप तुम्ही वापरू शकता.

  5. वायरलेस चार्जिंग : या फोनची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यामध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह वायरलेस चार्जिंग फीचर देण्यात आलं आहे. त्यामुळे मोबाईल चार्जिंगला लावलेला असतानाही तुम्ही काही अंतरावर बसून फोन वापरु शकता.

  6. IP68 वॉटरप्रूफ : तुमचा फोन पाण्यात भिजला तरीही तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण गॅलक्सी नोट 8 वॉटरप्रूफ फोन आहे.

  7. सॅमसंग पे : या फीचरमुळे सॅमसंग युझर्स आणखी सुरक्षित पद्धतीने ऑनलाईन व्यवहार करु शकतात. सॅमसंग पे हे कंपनीचं मोबाईल आणि डिजीटल वॉलेट आहे.

  8. 6GB रॅम : या फोनमध्ये 6GB रॅमसोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर देण्यात आलं आहे. ग्राहकांना हा फोन खरेदी करताना 64GB/128GB/256GB असे तीन व्हेरिएंटचे पर्याय मिळतील.


संबंधित बातमी : सॅमसंग गॅलक्सी नोट 8 लाँच, किंमत, फीचर्स आणि लाँचिंग ऑफर्स