एक्स्प्लोर

Tanisha Bhise Death Case: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉ.घैसासांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने बजावली नोटीस;लेखी उत्तर देण्याची आज संध्याकाळापर्यंतची डेडलाईन   

Tanisha Bhise Death Case : पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी आरोप लागलेले डॉ. सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोटीस बजावत जाब विचारला आहे.

Tanisha Bhise Death Case : पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital)  गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी आरोप लागलेले डॉ. सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोटीस बजावत जाब विचारला आहे. आज संध्याकाळपर्यंत डॉ. घैसास यांना त्यांचे लेखी उत्तर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे सादर करायचे आहे. त्यानंतर त्या उत्तराचा वैद्यकीय दृष्टिकोनातून अभ्यास करून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल याप्रकरणी डॉ. घैसास तसेच पीडित कुटुंबीय यांना मेडिकल कौन्सिलच्या मुंबई येथील कार्यालयात सुनावणीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.

दरम्यान पीडित कुटुंबीयांनी केलेली तक्रार तसेच राज्य महिला आयोगाकडून आलेल्या सूचनानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालय व्यवस्थापनाकडे माहिती मागितली होती. रुग्णालयाने दिलेल्या माहितीच्या आधारावरच डॉ. घैसास यांना नोटीस बजावून खुलासा मागितल्याची माहिती महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ. विंकी रुघवाणी यांनी दिली आहे. 

तीन अहवाल सादर तरी मंगेशकर रुग्णालयावर कारवाई का नाही? - अमित गोरखे

तनीषा भिसेंच्या मृत्यू प्रकरणी आत्तापर्यंत तीन अहवाल सादर झालेत. मात्र त्यानंतर ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होताना दिसत नाहीये. असं असलं तरी या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे मात्र आत्तापर्यंतच्या चौकशीबाबत समाधानी आहेत. परंतु या प्रकरणी गोरखेंवर दबाव असल्यानं पुढील कारवाई मंदावली, असं बोललं जातंय. मात्र माझ्यावर कोणताही दबाव नाही. असं म्हणताना प्रकरण निकाली लागत नाही, तोपर्यंत मी पाठपुरावा करणार आहे. तसेच कारवाईला वेग यावा यासाठी उद्या मुंबईला जाऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचं गोरखे म्हणालेत. 

भिसें कुटुंबीयांचं रेशनिंग कार्ड केशरी रंगाचं आहे. मात्र त्यांना अल्प उत्पन्न गटातून उपचार दिले जाणार नव्हतेचं. मुळात रुग्णाला उपचारासाठी दाखल करुन घेतले नाही, हा मूळ प्रश्न आहे. इतर गौण प्रश्नांवर चर्चा करण्यात अर्थ काय. असा प्रतिप्रश्न उपस्थित करत भिसे कुटुंबियांना बदनाम करणं बंद करावं, असं आवाहन गोरखेंनी केलंय.  तनीषा भिसेंच्या मृत्यूप्रकरणाचा दुसरा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर सादर करण्यात आलाय. धर्मादाय आयुक्त आणि यमुना जाधवांनी चौकशी केलेल्या या अहवालात ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी धरण्यात आल्याचं, सूत्रांची माहिती आहे. याचं अहवालानंतर मुख्यमंत्र्यांशी भेट घेतलेले भाजपचे विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखेंनी ही डॉ सुकृत घैसास यांना दोषी धरल्याची प्राथमिक माहिती मला प्राप्त झालीये, असा दावा केला.

मात्र याप्रकरणी डॉक्टर घैसासांनी राजीनामा दिला असताना गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई होताना दिसते. मात्र माता मृत अन्वेषण समितीचा अहवाल सादर होताच, कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्याचा दावा ही गोरखेंनी केलाय. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News: रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस; आंदोलन थांबवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू
Maharashtra Live News: रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस; आंदोलन थांबवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू
Rohit Pawar Protest : रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी....',
रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय',
Adhik Maas Amavasya: आजपासून अधिक मास अमावस्या सुरू! पॉवरफुल त्रिग्रही योगामुळे 5 राशी मालामाल, उत्पन्नाचे नवे मार्ग, तिथी, महत्त्व जाणून घ्या...
आजपासून अधिक मास अमावस्या सुरू! पॉवरफुल त्रिग्रही योगामुळे 5 राशी मालामाल, उत्पन्नाचे नवे मार्ग, तिथी, महत्त्व जाणून घ्या...
Washim Crime News: बायकोसह दोन मुलींना हात बांधून विहिरीत ढकललं; मग स्वत:नेही जीवन संपवलं; तिवळी गाव हळहळलं, एका आरोपाने गुंतागुंती वाढली!
बायकोसह दोन मुलींना हात बांधून विहिरीत ढकललं; मग स्वत:नेही जीवन संपवलं; तिवळी गाव हळहळलं, एका आरोपाने गुंतागुंती वाढली!

व्हिडीओ

Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी....',
रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय',
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून आला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून परतला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
Embed widget