Sydney Terrorist Attack: ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समधील सिडनी येथे झालेल्या गोळीबारात (Sydney Terrorist Attack) आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (14 डिसेंबर) सिडनीच्या बोंडी बीचवर (Bondi Beach) हनुक्का उत्सव साजरा केला जात होता. त्या संध्याकाळी दोन हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरु केला. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, या दहशतवादी (Sydney Terrorist Attack Marathi News) हल्ल्यातील गुन्हेगार एक वडील आणि मुलगा होते, त्यापैकी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. दरम्यान बोंडी बीचवर झालेल्या सामूहिक गोळीबारात एका नागरिकाच्या धाडसाने अनेकांचे जीव वाचवले आहे. अहमद अल अहमद असे त्याचे नाव आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अहमद एका बंदूकधारी व्यक्तीवर मागून हल्ला करत, त्याची रायफल हिसकावून घेत त्याला जमिनीवर ढकलत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या धाडसी कृत्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
अहमद अल अहमद कोण आहे? (Who is Ahmed Al Ahmed?)
स्थानिक मीडिया चॅनेल 7News नुसार, अहमद अल अहमद 43 वर्षांचा आहे आणि तो एक फळ विक्रेता आहे. गोळीबाराच्या वेळी तो तेथून जात होता. त्याला बंदुकांचा अनुभव नव्हता, तरीही त्याने धोक्याची पर्वा न करता हल्लेखोराला थांबवण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच्या याच धाडसी निर्णयाने अनेकांचे जीव वाचवले आहे. 15 सेकंदांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये अहमद प्रथम पार्क केलेल्या वाहनांच्या मागे लपलेला दिसतो. नंतर, योग्य संधी पाहून, तो मागून हल्लेखोरावर धावला, त्याची मान पकडली, त्याची रायफल हिसकावून घेतली आणि त्याला जमिनीवर ठाकले. परिणामी त्याच्या या धाडसाने अनेकांचे जीव वाचवलेत.
अहमद जखमी, रुग्णालयात दाखल (Sydney Terrorist Attack Marathi News)
हल्ल्यात अहमदला दोनदा गोळ्या लागल्या. 7News ने अहमदचा चुलत भाऊ मुस्तफा याच्याशी बोलले असता, त्यांनी सांगितले की अहमद रुग्णालयात दाखल आहे आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहेत. मुस्तफा म्हणाले, "तो 100% हिरो आहे. आम्हाला आशा आहे की तो बरा होईल." लोक ऑनलाइन अहमदचे कौतुक करत आहेत. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनीही त्यांना "हिरो" म्हटले आणि त्यांच्या शौर्याला सलाम केला.
इतर महत्वाच्या बातम्या