Sunita Williams Return: सुनीता विल्यम्स 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतल्या; फ्लोरिडाच्या समुद्रात लँड होताच डॉल्फिनने घेरलं, नेमकं काय घडलं?, VIDEO
Sunita Williams Return: सुनीता विल्यम्स यांची ड्रॅगन कॅप्सूल जेव्हा फ्लोरिडाच्या समुद्रात लँड झाली, त्यावेळी एक सुंदर दृश्य पाहायला मिळाले.

Sunita Williams Return: अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विल्मोर तब्बल 9 महिन्यांनी अंतराळातून पुन्हा पृथ्वीवर परतले आहेत. भारतीय वेळेनूसार आज (19 मार्च) पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर फ्लोरिडाच्या समुद्रात लँड झाले. यावेळी नासाची टीम अंतराळवीरांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी बोटीसह उपस्थित होती. अंतराळ संस्था नासाने अंतराळवीरांच्या लँडिंगचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
Splashdown confirmed! #Crew9 is now back on Earth in their @SpaceX Dragon spacecraft. pic.twitter.com/G5tVyqFbAu
— NASA (@NASA) March 18, 2025
सुनीता विल्यम्स यांची ड्रॅगन कॅप्सूल जेव्हा फ्लोरिडाच्या समुद्रात लँड झाली, त्यावेळी एक सुंदर दृश्य पाहायला मिळाले. जेव्हा सुनीता विल्यम्स आणि तिच्या साथीदारांना कॅप्सूलमधून बाहेर काढले जात होते, तेव्हा कॅप्सूलभोवती अनेक डॉल्फिन पाहायला मिळाले. यादरम्यानचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात काय काय केले?
अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (ISS) देखभाल आणि स्वच्छतेमध्ये आपली भूमिका बजावली. या स्टेशनला सतत देखभालीची आवश्यकता असते. असे म्हटले जाते की या स्टेशनचे क्षेत्रफळ जवळजवळ फुटबॉल मैदानाइतके आहे. सुनीता विल्यम्स यांनी जुन्या उपकरणांमध्येही बदल केले आणि काही प्रयोग केले. सुनीता विलियम्स यांनी स्पेस स्टेशनबाहेर तब्बल 62 तास 9 मिनिटे घालवली अर्थात 9 वेळा स्पेसवॉक केले. सुनीता विलियम्स आणि त्यांच्या टीमने 900 तास संशोधन केले. दरम्यान त्यांनी 150 हून अधिक प्रयोगही केले. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले.
सुनीता विल्यम्स फ्लोरिडाच्या समुद्रात लँड होताच डॉल्फिनने घेरलं, VIDEO:
There are a bunch of dolphins swimming around SpaceX's Dragon capsule. They want to say hi to the Astronauts too! lol pic.twitter.com/sE9bVhgIi1
— Sawyer Merritt (@SawyerMerritt) March 18, 2025
9 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या, VIDEO:
संबंधित बातमी:
Sunita Williams: ना भात, ना चपाती...; सुनीता विल्यम्स यांनी 286 दिवस अंतराळात काय खाल्लं?
Before You Go
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
महत्त्वाच्या बातम्या






















