100th Marathi Natya Sammelan : 100 व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्ताने विविध भारतीय भाषांमधील नाटकांचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. मराठी नाट्य सृष्टीची शिखर संस्था म्हणजे नाट्यपरिषद. नाट्यपरिषद सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असते, ज्यामुळे नाटक, रंगकर्मी आणि प्रेक्षक यांच्यातील संबंध कायम राहतो. नाट्यपरिषद नाटक, रंगकर्मी आणि प्रेक्षक यांच्यातील सेतू म्हणून काम करत असताना अनेक अभिनव उपक्रम, संकल्पना राबवते आता 100 व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्यमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

100 व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्यमहोत्सव आयोजन

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100 व्या नाट्य संमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे पहिल्यांदाच विशेष नाट्य महोत्सवाचं आयोजन केलं आहे. नुकतीच नाट्यपरिषदेची परकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत विशेष नाट्य महोत्सवाची घोषणा करण्यात आली.  या पत्रकार परिषदेला नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर,  प्रमुख कार्यवाह अजित भुरे , कार्यकारिणी सदस्य सविता मालपेकर आणि प्रमुख मंडळी उपस्थित होती.   

भारतीय भाषांमधील नाटकांचा आस्वाद घेण्याची संधी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित विशेष  नाट्य महोत्सव 20 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. मुंबईत भारतीय भाषांमधील हा नाट्य महोत्सव  रंगणार आहे. यशवंत नाट्य मंदिर, जयश्री आणि जयंत साळगांवकर प्रायोगिक रंगमंच, अण्णाभाऊ  साठे नाट्यगृह  या ठिकाणी या महोत्सवातील नाटकांचे सादरीकरण होणार आहे.  

या महोत्सवामागचा उद्देश असा की, मुंबईतील कलाकारांना आणि नाट्यरसिकांना वेगवेगळ्या राज्यातील, प्रांतातील नाटकं, त्यांचं सादरीकरण, तिथल्या कलाकारांविषयीच्या गोष्टी जाणून घ्यायला  मिळणार आहे, असं नाट्यपरिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी सांगितलं. बंगाली, तामिळ, इंग्रजी, मराठी अशा वेगवगळ्या भाषांमधल्या नाटकांचं सादरीकरण या विशेष नाट्य महोत्सवात होणार आहे. या नाट्यमहोत्सवाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

नियोजित कार्यक्रमांचे वेळापत्रक :

स्थळ : यशवंत नाट्य मंदिर - मुख्य रंगमंच

20 फेब्रुवारी 2025 अनीक थिएटर, कोलकता

नाटक : अक्षरिक (बंगला)सायंकाळी 7.30 वाजता 

21 फेब्रुवारी 2025 थिएटर अर्पणा, मुंबई

नाटक : बॅरीकेड (हिंदी)सायंकाळी 7.30 वाजता

22 फेब्रुवारी 2025 राखाडी स्टुडिओ, पुणे

नाटक : ठकीशी संवाद (मराठी)दुपारी 4.30 वाजता

23 फेब्रुवारी 2025 वेलिपडई थिएटर मूवमेन्ट, पाँडिचेरी

नाटक : नाडापावाडई (तामिळ)सायंकाळी 7.00 वाजताप्लेहाऊस प्रोडक्शन, मुंबईनाटक : गरम रोटी(इंग्रजी, तामिळ, हिंदी) रात्री 9.00 वाजता

स्थळ : जयश्री आणि जयंत साळगावकर प्रायोगिक रंगमंच

24 फेब्रुवारी 2025 टाईनी टेल्स थिएटर कंपनी, पुणे

नाटक : तुजी औकात काये? (मराठी)सायंकाळी 7.00 वाजतापरिसंवाद - प्रायोगिक नाटकसहभाग - आलोक राजवाडे, युगंधर देशपांडे, प्रतीक्षा खासनीस, योगेश्वर बेंद्रेसंवादक - सचिन शिंदरात्री 8.30 वाजता

25 फेब्रुवारी 2025 रेनबो अंब्रेला प्रोडक्शन, पुणे

नाटक : मग तू मला खा! (मराठी)सायंकाळी 7.00 वाजता मेधा अग्रवाल, पुणे

नाटक : एसिमष्टोमॅटीक (इंग्रजी, हिंदी)रात्री 8.30 वाजता

26 फेब्रुवारी 2025

अच्युत वझे लिखित

'चल रे भोपळ्या टुणूकटुणूक' या नाटकाचे पुस्तक प्रकाशन सायंकाळी 7.00 वाजता

परिसंवाद - व्यावसायिक नाटकसहभाग - अद्वैत दादरकर, नीरज शिरवईकर, संदेश बेंद्रे, संवादक - मुग्धा गोडबोले रात्रौ 7.30 वाजता

27 फेब्रुवारी 2025 

पार्थ थिएटर

नाटक : मॅड सखाराम (मराठी) सायंकाळी 7.00 वाजता

नाटक : मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास (मराठी) रात्री 9.00 वाजता

28 फेब्रुवारी 2025

थिएटर फ्लेमिंगो, काणकोण, गोवा

नाटक : मुकभट (कोंकणी)सायंकाळी 7.00 वाजता थिएटर फ्लेमिंगो, काणकोण, गोवा

नाटक : स्टँडअप विनोद (मराठी)रात्री 9.00 वाजता

स्थळ : आण्णाभाऊ साठे नाट्यगृह, भायखळा

बालनाट्य - नाट्यरंग थिएटर, जळगाव

म्हावरा घावलाय गोसकाळी 10.00 वाजतानाट्य छटा

शर्व दाते, पुणेसकाळी 11.20 वाजतानाट्य छटा

अर्पिता येवले, पुणेसकाळी 11.30 वाजतानाट्य छटा

निषाद दांडेकरसकाळी 11.40 वाजतानाट्य वाचन - कलाकंड, पुणे

कवटीतला कैदीसकाळी 11.50 वाजतानाटव वाचन - सिंदफणा पब्लिक स्कूल, माजल

दगड पडलेला प्रश्नसकाळी 12.15 वाजताअ.भा. मराठी नाट्य परिषद, धाराशिव शाखा

पारंपारिक नृत्यसकाळी 12.40 वाजताप्रगती सेवाभावी संस्था, बीड

एकांकिका - नवसदुपारी 1.00 वाजताएकपात्री

किशोर पुराणिक, परभणीदुपारी 2.30 वाजताएकपात्री

पुजा घोडके, नाशिकदुपारी 2.40 वाजताएकपात्री

वेदिका वाबळेदुपारी 2.50 वाजतानाट्य संगीत पद गायन

सार्थक बावीकरदुपारी 3.00 वाजता