Ujani Solapur Water Supply : उजनी धरणातून (Ujani Dam) सोलापूरला (Solapur) पाणीपुरवठा करणाऱ्या दुहेरी जलवाहिनीची चाचणी सुरु केली आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गांवरील लांबोटी गावाजवळील चंदननगरपर्यंत पाणी पोहोचले आहे. काही दिवसापूर्वी उजनी धरण ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झालं आहे. या जलवाहिनीची चाचणी सोलापूर महापालिकेच्या वतीने घेतली जात आहे. लांबोटीजवळ सोलापूर मनपाच्या वतीनं नव्या पाईपलाईनचे वॉशआउट करण्यात आले आहे. यापुढे लांबोटी ते सोरेगाव दरम्यान चाचणीचे कामं केले जाणार आहे. सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा अधिकारी व्यकटेश चौबे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
आणखीन दोन ते तीन चाचण्या होणार
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उजनी ते सोलापूर दरम्यान नवीन झालेली दुहेरी पाईपलाईन लांबोटी येथे तपासण्यात आली. पाणी किती उंच उडते आणि प्रेशर किती असेल हे आजच्या चाचणीतून तपासण्यात आले आहे. यापुढे देखील आणखीन दोन ते तीन चाचण्या होणार आहेत. उजनी ते लांबोटीपर्यंत पाणी व्यवस्थित पोहोचले असे म्हणता येईल असे पाणीपुरवठा अधिकारी व्यकटेश चौबे म्हणाले. पाईपलाईन कुठेही फुटलेली नाही. चाचणी झालेले पाणी सोडण्यात आले आहे. शिवाय पाणी वाया घालवले असे देखील म्हणता येणार नाही. पाईपलाईन मधील पाणी वाशआऊट करुन बाहेर काढण्यात आले आहे. पुढील पंधरा दिवसात आणखीन अशा दोन चाचण्या होतील त्यावेळेस देखील पाणी अशाच पद्धतीने उडेल. येणाऱ्या पंधरा दिवसात सर्व चाचण्या पूर्ण होऊन सोलापूर दुहेरी जलवाहिनी सुरू होईल असे पाणीपुरवठा अधिकारी व्यकटेश चौबे म्हणाले. लोकांचे म्हणणे आहे की पाईपलाईन फुटली आहे, पण प्रसशासनाने दावा केला आहे की, चाचणी सुरु आहे.
उजनी धरणावर उभारलेल्या नवीन पंपगृहात 1150 अश्वशक्ती क्षमतेचे सहा पंप बसविण्यात आले असून, आज 1150 अश्वशक्ती क्षमतेचे एक पंप प्राथमिक चाचणीसाठी सुरु करण्यात आले. या एका पंपाद्वारे सोलापूरपर्यत किती वेळेत, किती MLD पाणी पोहोचणार आहे याची माहिती देण्यात आली. या प्रकल्पामुळे सोलापूरकरांना नियमित पाणीपुरवठा होईल. नदी वाटे जे पाणी वाया जात होते, त्यात बचत होऊन ते पाणी शेती करण्याऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळं या जलवाहिनीचा मोठा फायदा होणार आहे. तसेच पाण्याचा प्रश्न देखील मिटणार आहे.
महत्वाच्या बातम्या: