Ujani Dam News : राज्याच्या विविध भागात सध्या चांगला पाऊस (Heavy Rain) झाला आहे. या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात चांगला वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यंदा उजनी धरणाच्या (Ujani Dam) पाणलोट क्षेत्रात देखील पहिल्याच टप्प्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळं उजनी धरणाने गेल्यावर्षीची पाणी साठवण पातळी ओलांडली आहे. आता धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरु झाली आहे.
सध्या उजनी धरणात 66.50 टक्के एवढा पाणीसाठा
गेल्यावर्षी पावसाने ओढ दिल्याने धरण भरणार नाही याचा अंदाज सर्वांना होता. अखेर दुसऱ्या टप्प्यात थोडा चांगला पाऊस झाल्याने गेल्यावर्षी 12 ऑक्टोबर 2023 रोजी उजनी धरण 60.66 टक्के एवढे भरले होते. त्यामुळं वर्षभर पाणी टंचाईची टांगती तालावर सातत्याने समोर होती. काल म्हणजे 1 ऑगस्ट रोजी दुपारी उजनी धरणाने गेल्यावर्षीची पाणी पातळी ओलांडून शंभरीकडे प्रवास सुरु केला आहे. आज सकाळी उजनी धरणात 66.50 एवढा साठा झाला असून 30 हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी धरणाकडे येत आहे. सध्या पुणे जिल्ह्यात पावसाची ये जा सुरु असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक देखील सातत्याने बदलत आहे. धरणाची वाटचाल शंभरीकडे सुरु आहे.
आज दुपारपर्यंत धरणात 100 टीएमसी पाणी जमा होणार
सध्या उजनी धरणात 99 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा असून, आज दुपारपर्यंत धरणात 100 टीएमसी पाणी जमा होणार आहे. उजनी धरणाची सुधारत चाललेल्या पाणीपातळीमुळं बळीराजा आनंदी आहे. उजनी धरणावर परिसरातील 40 पेक्षा जास्त साखर कारखाने अवलंबून आहेत. त्यामुळं उजनी धरण 100 टक्के भरणे सर्वांसाठीच खूप महत्वाचे आहे.
उजनी धरण हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं
उजनी धरण हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असं धरण आहे. कारण या धरणाच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील मोठं शेतीचं क्षेत्र बागायती आहे. त्यामुळं उजनीच्या पाण्याचं महत्वं मोठं आहे. मात्र, मागील वर्षी उजनी धरण हे 64 टक्केच भरलं होतं. त्यामुळं ऐन उन्हाळ्यात ज्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची गरज असते, त्यावेळी पिकांना पाणी मिळालं नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची हातची पिकं वाया गेली. यावर्षी मात्र, हवामान विभागानं चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस होत आहे. उजनी धरण क्षेत्रात देखील चांगला पाऊस होत आहे. त्यामुळं शेतकरी आनंदी आहेत. दरम्यान, उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येण्यासाठी पुणे जिल्ह्यात देखील चांगल्या पावसाची गरज असते. कारण, पुणे जिल्ह्यातील धरणं ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्या धरणातून पाणी उजनीत सोडले जाते. त्यामुळं क्षमतेनं मोठं असणारं धरण देखील वेगाने भरते. त्यामुळं उजनी धरण लवकर भरण्यासाठी पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या: