Solapur Zilla Parishad News : पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi)यांच्या आवाहनाला सोलापूर जिल्हा परिषदेकडून प्रतिसाद देण्यात आला आहे. प्रत्येक सोमवारी झेडपीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कर्मचारी हे गाडी वापरणार नाहीत. असा नियम करणारी सोलापूर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद ठरली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष एसटीने तरी उपाध्यक्ष सायकलवर जिल्हा परिषदेत येणार  आहेत. तर जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी पेट्रोल, डिझेलच्या गाडीचा वापर करणार नाहीत.

Continues below advertisement

परिपत्रक काढून सर्व कर्मचाऱ्यांना हा निर्णय अनिवार्य, नागरिकांना मात्र कोणताही नियम बंधनकारक नाही

आखाती देशातील युद्धामुळे आपल्या देशावर भविष्यात उद्भवणारे संकट टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, खाद्यतेलाची बचत करा आणि अनावश्यक परदेश दौरे पुढे ढकला, असं आवाहन त्यांनी केलं. त्यांच्या या आवाहनला सोलापूर जिल्हा परिषदेनं प्रतिसा दिला आहे. प्रत्येक सोमवारी झेडपीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कर्मचारी हे गाडी वापरणार नाहीत. असा नियम करणारी सोलापूर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद ठरली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष एसटीने तरी उपाध्यक्ष सायकलवर जिल्हा परिषदेत येणार  आहेत. दरम्यान, याबाबत आम्ही परिपत्रक काढून सर्व कर्मचाऱ्यांना हा निर्णय अनिवार्य करत आहोत. नागरिकांना मात्र याबाबत कोणताही नियम बंधनकारक नाही, अशी माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी दिली आहे. 

 जिथे शक्य असेल तिथे Work From Home चा पर्याय स्वीकारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडील भाषणात इंधनाचा वापर कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक, कारपूलिंग आणि जिथे शक्य असेल तिथे Work From Home चा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन केले होते. त्यामागचा उद्देश वाढत्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा इंधन आयात खर्च आणि विदेशी चलनावरील दबाव कमी करणे हा आहे.

Continues below advertisement

नरेंद्र मोदी यांची देशवासियांना उद्देशून केलेली नऊ आवाहने

1  पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा कारण दर खूप वाढले आहेत2  खाद्यतेलाचा वापर मर्यादित जपून करा3  पुढील एक वर्ष सोनं खरेदी करू नका4  वर्षभर परदेशी प्रवास टाळा5  कच्च तेल वाचवण्यावर भर द्यायचा आहे6  परकीय चलन वाचवण्यावर भर द्यायचा आहे, परकीय चलन साठा आपल्याला कमी होऊ द्यायचा नाही7  जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करा8  वर्क फ्रॉम होम वर भर द्या, ऑनलाईन बैठकांवर भर द्या9  परकीय उत्पादनांची खरेदी कमी करा

महत्वाच्या बातम्या:

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र