एक्स्प्लोर

Solapur News : सोलापूर एमआयडीसी आग दुर्घटनेत चक्रावणारा निर्णय, पोलिसांकडून कारखान्याच्या मृत मालकावरच गुन्हा दाखल

Solapur News : सोलापूर एमआयडीसी परिसरातील सेंट्रल इंडस्ट्री या फॅब्रिकेशन कारखान्यात 18 मे रोजी भीषण आग लागली होती. या आगीत तब्बल 8 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता.

Solapur News : सोलापूर एमआयडीसी (Solapur MIDC) परिसरातील सेंट्रल इंडस्ट्री या फॅब्रिकेशन कारखान्यात 18 मे रोजी भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेला अखेर 18 दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे. या आगीत तब्बल 8 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. याप्रकरणात मृत मालकासह त्याचा मुलगा व सून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या इमारतीत अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. बांधकाम करताना सुरक्षेचे कोणतेही निकष पाळले गेले नाहीत. मार्जिन न सोडणे, कामगारांना निवासासाठी परवानगी नसताना इमारतीत ठेवणे आणि अग्निशमन सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना न करणे आदी गंभीर त्रुटीमुळे ही दुर्घटना घडल्याचे निष्पन्न झाले आहे.

या पार्श्वभूमीवर, सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात कारखान्याचे मालक उस्मानभाई मन्सुरी (मृत), त्यांचा मुलगा हनीफ उस्मानभाई मन्सुरी आणि सून इशरत हनीफ मन्सुरी यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 106 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर एमआयडीसी, अग्निशमन विभाग, व सोलापूर महापालिकेच्या बांधकाम विभाग यांनी संयुक्तपणे तपास करून अहवाल सादर केला. यानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय बनसोडे यांनी या प्रकरणात फिर्याद दाखल केली आहे.

नेमकं काय घडलं होतं? 

अक्कलकोट रोड एमआयडीसीतील सेंट्रल इंडस्ट्रीज या कारखान्याला 18 मे रोजी पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली. कारखान्याचे मालक उस्मान हसन मन्सुरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य याठिकाणीच वास्तव्यास होते. तसेच, चार कामगारही कारखान्यातच राहायचे. टॉवेलच्या कच्च्या मालाला आग लागल्यामुळे ती वेगाने पसरली आणि भडकली. आग इतकी झपाट्याने पसरली की, आतमध्ये अडकलेल्या आठ जणांना बाहेर पडता आले नाही. 

घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट एमआयडीसी केंद्रातील सोलापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचा एक बंब तातडीने घटनास्थळी पोहोचला. मात्र आगीचे भयावह स्वरूप पाहून अन्य केंद्रांतील अग्निशमन बंबांना देखील पाचारण करण्यात आले. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असताना पाण्याच्या कमतरतेमुळे अडथळे निर्माण झाले. या दरम्यान, मेहताब बागवान, त्यांची मुलगी हिना वसीम शेख आणि मुलगा सलमान मेहताब बागवान या तिघांचे मृतदेह सकाळीच सापडले. दुपारपर्यंत सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान कारखान्याचे मालक उस्मान मन्सुरी, त्यांचा नातू अनस, नातसून शिफा मन्सुरी, नातवाचा मुलगा युसूफ आणि कामगार मेहताब बागवान यांची पत्नी आयेशा बागवान यांचे मृतदेह सापडले होते. या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली गेली. 

आणखी वाचा 

Mumbai Fire : चर्चेगेट रेल्वे स्थानकात लागलेली आग आटोक्यात, शॉर्टसर्किटमुळे सर्वत्र धूर अन् प्रवाशांची एकच धावपळ

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News:  नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
कोल्हापूर : नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन
पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन
Devendra Fadnavis : मी कोणावरही टीका करत नाही, आमच्याकडे नीती, नियती आहे अन् निधी देखील आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य; राज्याच्या तिजोरीबाबत पुनर्उच्चार?
मी कोणावरही टीका करत नाही, आमच्याकडे नीती, नियती आहे अन् निधी देखील आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य; राज्याच्या तिजोरीबाबत पुनर्उच्चार?
Accident: भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Top 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 29 नोव्हेंबर 2025
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही
Sharad Pawar on Congress :  मुंबई पालिकेसाठी काँग्रेसचा 'स्वबळाचा' नारा: महाविकास आघाडीत तणाव! उद्धव ठाकरे, शरद पवारांकडून नाराजी व्यक्त
chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News:  नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
कोल्हापूर : नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन
पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन
Devendra Fadnavis : मी कोणावरही टीका करत नाही, आमच्याकडे नीती, नियती आहे अन् निधी देखील आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य; राज्याच्या तिजोरीबाबत पुनर्उच्चार?
मी कोणावरही टीका करत नाही, आमच्याकडे नीती, नियती आहे अन् निधी देखील आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य; राज्याच्या तिजोरीबाबत पुनर्उच्चार?
Accident: भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
Kolhapur News: मुरगुडला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात दोन पत्रावळीत लिंबू, नारळ, हळद टाकत भानामती!
मुरगुडला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात दोन पत्रावळीत लिंबू, नारळ, हळद टाकत भानामती!
Sujay Vikhe Patil: शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाबाबत सुजय विखे-पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, पुन्हा वादाला तोंड फोडलं, म्हणाले...
शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाबाबत सुजय विखे-पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, पुन्हा वादाला तोंड फोडलं, म्हणाले...
Nilesh Rane Vs BJP: गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापले, रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, म्हणाले, 'गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही'
गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापले, रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, म्हणाले, 'गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही'
लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह  पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
Embed widget