Solapur: “कपडे काढा आणि घागरीने संपूर्ण गावाला पाणी पुरवा!” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं आहे. वेळापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला वीज कनेक्शन मिळत नसल्याने आमदार जानकर यांचा संताप अनावर झाला. गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा करूनही वीज कनेक्शन दिलं जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना घरातील घागरी आणून गावाला पाणी पुरवण्याचा संतप्त आदेश दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Solapur news)

Continues below advertisement

उत्तम जानकारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं

सध्या अनेक भागांमध्ये दुष्काळाची तीव्रता जाणवत असून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत वेळापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला वीज कनेक्शन मिळत नसल्याने आमदार उत्तम जानकर यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. आपल्या घरातील घागरी देऊन अंगातले कपडे काढा आणि घागरीने सगळ्या गावाला पाणी द्या असा आदेश दिला. एका बाजूला दुष्काळाची दाहकता जाणवत असताना वीज वितरण विभागाचे अधिकारी या पाणीपुरवठ्यासाठी वीज कनेक्शन देत नसल्याने आमदार जानकर संतापले होते. पाईपलाईनसाठी उत्तम जानकर यांनी आमदार फंडातून ट्रान्सफॉर्मर आणि संपूर्ण विजेची लाईन उभी करून दिली आहे. 

याच मुद्द्यावरून संतापलेल्या आमदार जानकर यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. “तुमच्या घरातील घागरी आणा, अंगातील कपडे काढा आणि घागरीने संपूर्ण गावाला पाणी द्या,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. दरम्यान, आमदारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी वीज कनेक्शन जोडून देण्याचं आश्वासन दिल्याची माहिती आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना प्रशासकीय कामकाजातील दिरंगाईमुळे नागरिकांच्या अडचणी वाढताना दिसतात.आमदार उत्तम जानकर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Continues below advertisement