Sayajiraje Water Park news: सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये (Water park) बुधवारी भीषण अपघात झाला होता. सयाजीराजे पार्कमधील फिरता पाळणा उंचावरुन खाली पडून त्यामधील चार जण गंभीररित्या जखमी झाले होते. यापैकी भिगवणमधील प्रसिद्ध युवा उद्योजक तुषार धुमाळ (Tushar Dhumal) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तुषार धुमाळ हे पुणे जिल्ह्यातील भिगवणचे प्रसिद्ध एलआयसी उद्योजक होते.

तुषार धुमाळ हे त्यांच्या दोन मित्रांसह सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये (Sayajiraje Water Park)  फिरायला आले होते. तिघे मित्र राईडमध्ये (Ride) बसले, पण राईडचा वेग वाढल्यानंतर अचानक पाळणा खाली कोसळला. राईडचा वेग जास्त असल्यामुळे पाळणाही त्याच वेगामध्ये खाली पडला आणि तुषार धुमाळ यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या डोक्याला जबर मार बसला होता. त्यामुळे तुषार धुमाळ यांचा जागीच मृत्यू झाला होता. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर धुमाळ यांच्या दोन मित्रांपैकी एकाची मान फ्रॅक्चर झाली आहे.

कोण आहेत तुषार धुमाळ?

तुषार धुमाळ हे भिगवण येथील युवा उद्योजक होते. एलआयसी वर्तुळात त्यांचे मोठे प्रस्थ होते. अल्पावधीतच त्यांनी भिगवण आणि आजुबाजूच्या परिसरातील उद्योग वर्तुळात मोठे नाव कमावले होते. त्यांच्या मृत्यूमुळे भिगवण परिसरात खळबळ उडाली आहे. एका युवा उद्योगपतीचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Solapur Akluj News: सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये नेमकं काय घडलं?

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे असणाऱ्या सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये पावसाळ्याच्या काळात पर्यटक मोठ्याप्रमाणावर गर्दी करतात. तुषार धुमाळ आणि त्यांचे तीन मित्र बुधवारी या पार्कमध्ये गेले होते. ते एका राईडमध्ये बसले होते. या राईडचा वेग वाढल्यानंतर तुषार धुमाळ यांचा पाळणा अचानक खाली कोसळला. हा पाळणा उंचावरुन खाली पडल्यामुळे आतमध्ये बसलेले तुषार धुमाळ आणि त्यांच्या मित्रांना जबर दुखापत झाली. तुषार धुमाळ यांच्या डोक्याला जबर मार लागला. प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्यांचा लगेच मृत्यू झाला. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला, कोणत्या कारणामुळे पाळणा तुटून खाली पडला, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरु असून तपासातून येत्या काही दिवसांत ठोस माहिती समोर येण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा

सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये भीषण दुर्घटना, हवेतूनच पाळणा तुटला; एकाचा मृत्यू, 2 जखमी