Solapur Madha News : सध्या राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरु होऊन चार महिन्यांचा कालावधी होत आला तरी पाऊस पडला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची उभी पिकं करपु लागली आहेत. अशातच ठिकठिकाणी पाण्यासाठी आंदोलने उपोषण होत आहेत. माढा तालुक्यातील जामगावमध्ये देखील बार्शी उपचा सिंचन योजनेतून उजनी धरणाचं पाणी आम्हाला मिळावं यासाठी उपोषण सुरु करण्यात आलं आहे. हे आंदोलन माढा तालुक्यातील जामगाव आणि बार्शी तालुक्यातील तुर्क पिंपरी आणि मालवंडीच्या ग्रामस्थांनी सुरु केलं आहे. विशेष म्हणजे दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या एका युवकानं गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषण सुरु केले आहे. मालोजी चव्हाण असं या युवकाचं नाव आहे. मी संविधानिक मार्गाने पाणी मागितलं आहे पाणी मिळालं नाहीतर प्रशासनाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा मालोजीने दिला आहे.
पाईपालाईन केली मात्र, वर्षभरापासून पाणीच सोडलं नाही
बार्शी उपसा सिंचन योजनेतून उजणी धरणाचे पाणी मिळावं यासाठी दोन्ही डोळ्यांनी अंध असणाऱ्या मालोजी चव्हाण या युवकानं गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषण सुरु केले आहे. एबीपी माझाने उपोषण करणाऱ्या मालोजी चव्हाण यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. बार्शी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून उजनी धरणाचे पाणी पाईपलाईनद्वारे जामगाव, तुक्र पिंपरी आमि मालवंडीच्या शिवारात आणलं आहे. सगळं कामही पूर्ण झालं आहे. मात्र, आमच्याकडे अद्याप वर्षभरापासून पाणी सोडलं नसल्याचे मालोजी चव्हाण यां युवकाने सांगितले. मागील वर्षी ट्रायलसाठी पाणी सोडण्यात आलं होतं. मात्र, यावर्षी दुष्काळी परिस्थिती असतानाही पाणी सोडण्यात आलं नाही.
जनवरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न
पाऊस नाही पाणी नाही असी परिस्थिती निर्माण झाली आहे. जनवरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याची माहिती मालोजी चव्हाण या युवकाने दिली आहे. काही गावांना पाच वेळेस पाणी मिळाले आहे मात्र, आमच्या गावाला अद्याप पाणी मिळालं असल्याची माहिती देखील मालोजीने दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बार्शी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती पाहणी करण्यासाठी आले होते. त्याच बार्शी उपसा सिंचन योजनेतून आम्हाला पाणी मिळते. मात्र, पाणी सोडले नसल्याचे मालोजीने सांगितले. आम्हाला दया नको संधी हवी आहे. सोने पिकवण्यासाठी. प्रशासन दया दाखवत आहे पण आम्हाला संधी द्या पाणी सोडा असे मालोजीने सांगितले.
पाणीच आलं नाहीतर पाणीपट्टी आम्ही भरु, ग्रामस्थांचा सवाल
आणची पिकं जळू लागली आहेत. उजी धरणाचे आणच्या हक्काचे पाणी आम्हाला पाहिजे असे ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. फक्त पाईपलाई करुन ठेवली आहे. मात्र पाणी सोडत नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दली आहे. जनावरांसाठी तरी पाणी सोडावं अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. प्रशासन म्हणच आहे की आठ दिवसांनी पाणी सोडतो पण आठ दिवस कशीला? काही मुहूर्त आहे का? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. पाणी आले नसतानाही आणच्याकडे पाणीपट्टी मागितली जात आहे. पाणीच आलं नाहीतर पाणीपट्टी आम्ही भरु असा खडा सवाल देखील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
जून महिन्यापासूव पाऊस झाला नाही. त्यामुळं गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आठ दिवसात पाणी सोडतो असे प्रशासन म्हणत आहे. पण आठ दिवस कशाला? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासन उडावा उडवीची उत्तरे देत आहे. राजकीय लोकं याकडे लक्ष देत नसल्याची भूमिका देखील ग्रामस्थांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली.