Solapur: 'पप्पा मी गड चढला' हे अभिमानाने सांगताच 23 वर्षीय तरुणी सज्जनगडावर कोसळली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. करमाळा येथील श्रावणी निमकर या तरुणीचा हा मृत्यू हृदयाला छिद्र असल्याने झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हृदयद्रावक घटनेने तिच्या कुटुंबावर आणि मित्रमंडळींवर शोककळा पसरली आहे. श्रावणी राहुल निमकर असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
श्रावणी ही बीएस्सीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होती.सोमवारी (२८ जुलै) रोजी ती आपल्या मैत्रिणींसोबत सहलीसाठी सज्जनगडावर गेली होती. सज्जनगडावर करमाळ्यातील एका खासगी क्लासची सहल आली होती. त्यात श्रावणी आणि तिच्या वर्गमैत्रिणीही होत्या. सज्जनगडाच्या पायऱ्या चढत ती एकेक टप्पा पार करत होती. दम लागला, तरी तिच्या चेहऱ्यावर फक्त आनंद होता. कारण तिला माहीत होतं तिचा हट्ट पूर्ण होत होता. गड चढून आल्यानंतर तिने आपल्या वडिलांना फोन करून सांगितले, “पप्पा, मी गड चढला.” एवढे बोलून ती अचानक खाली कोसळली. मैत्रिणींनी तातडीने तिला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. हृदयाला छिद्र असल्याने अचानक त्रास होऊन तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
श्रावणीच्या वडिलांनी सांगितले की, “तिला सहलीला जाऊ नकोस, थकवा येईल, असे आम्ही वारंवार सांगत होतो. पण ती उत्साही होती. गड चढून झाल्यावर तिने आनंदाने फोन केला आणि काही क्षणात ती गेली. हे आम्हाला अजूनही स्वीकारता येत नाही.” या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, तिच्या अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेह सोमवारी सकाळी करमाळा येथे आणण्यात आला. श्रावणी ही अभ्यासात हुशार, शांत आणि मनमिळावू स्वभावाची होती. तिच्या अकाली जाण्याने शिक्षक, सहाध्यायी आणि परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
बिअर बारमधील त्या फाईल्स सरकारी
एखाद्या सरकारी कार्यालयात दारु पिणे किंवा पार्ट्या करण्याचा प्रकार अनेकदा उघडकीस आला आहे. अनेकदा सोशल मीडियावर सरकारी कार्यालयातच अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी पार्ट्या झोडल्याचे व्हिडिओही व्हायरल (Viral) झाले होते. मात्र, आता चक्क एका बारमध्ये अधिकारी सरकारी फाईली घेऊन बसल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूर (Nagpur) शहरातील एका परमीट व बिअर बारमध्ये शासकीय फाईल घेऊन तीन व्यक्ती बसून चर्चा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल होता. याप्रकरणी, पोलिसांनी (Police) चौकशी सुरू केली असून या फाईल्स सरकारी कार्यालयातीलच असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.