Jaykumar Gore: चांद्यापासून बांद्यापर्यंत जो कोणी मिळेल अगदी तो मग बलात्कारातील आरोपी असेल किंवा भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप झालेला असेल किंवा आणखी गंभीर आरोप असतील त्यांना भाजपमध्ये पावन करून प्रवेश दिला जात असल्याने भाजपच्या अनेक निष्ठावंतांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. अलीकडेच भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा फक्त भाजपला आणि त्र्यंबकेश्वरमधील शनि मंदिराला दरवाजा नसल्याचे म्हटलं होतं. इतकेच नव्हे तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा जे घाऊक प्रमाणामध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश झाले यावरूनही मोठा गदारोळ उठला होता. नाशिकमध्ये रणकंदन या विरोधात पाहायला मिळाले. सोलापूरमध्ये सुद्धा भाजपच्या निष्ठावंतांनी भाजपलाच सहकार्य न करण्याची भूमिका घेतली होती.
आयाराम गयारामांवरून चांगलीच चिडचिड
या सर्व पार्श्वभूमीवर आता सोलापूरचे पालकमंत्री यांची याच आयाराम गयारामांवरून चांगलीच चिडचिड झाल्याचे दिसून आलं. निमित्त होतं महापौर निवडीवरून. यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारताना आयाराम गयाराम शब्द वापरला असता सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे चांगलेच चिडल्याचे दिसून आलं. यावेळी त्यांनी थेट वेळ साधनशुचिता वापरण्याचा सल्ला दिला. महापौर म्हणून आयारामाना संधी मिळणार की निष्ठावंत कार्यकर्त्यांना मिळणार? असा प्रश्न विचारताच जयकुमार गोरे म्हणाले की, भाजपचं सदस्यत्व स्वीकारून भाजपच्या तिकिटावर निवडून येणाऱ्या लोकांबद्दल थोडं अदबीने बोललं पाहिजे.प्रत्येकवेळी आपण अशा पद्धतीची भाषा वापरणे योग्य नाही. त्यामुळे सर्वांनी भाजप म्हणून एकत्र काम केलं पाहिजे. आपण प्रश्न विचारताना साधनशुचिता ठेऊन आणि लोकांचा सन्मान राहील अशा पद्धतीने बोलले पाहिजे. तुम्ही देखील एका वर्तमानपत्रातून पत्रकारिता कधी दुसऱ्या वर्तमानपत्रातून पत्रकारिता करता हे लक्षात घेतलं पाहिजे.
इतर महत्वाच्या बातम्या