Solapur : येत्या 26 मे पासून सोलापूर विमानतळावरुन विमानसेवा (Airline) सुरु होणार आहे. त्यामुळं 16 मे पासून विमानसेवेची बुकिंग होणार सुरु होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (Kumar Ashirwad) यांनी दिली आहे. पहिल्या टप्यात आठवड्यातून दोन दिवस सोलापूर-गोवा विमानसेवा असणार आहे. सोमवार आणि शुक्रवार हे दोन दिवस गोव्यासाठी विमानांचे उड्डाण होमार आहे.
ऑनलाईन आणि विमानतळावरुन तिकीट बुकिंगची सुविधा सुरु करण्यात येणार
16 मे पासून ऑनलाईन आणि विमानतळावरुन तिकीट बुकिंगची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. गोव्यातून सोलापूरसाठी सकाळी 7.20 मिनिटांनी विमान उडेल तर सोलापुरातून गोव्यासाठी 8:50 मिनिटाने विमान उडणार आहे. सोलापूर विमानतळ विमान सेवेसाठी पूर्णपणे सज्ज झालं असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. दरम्यान, सध्या सोलापूर-गोवा आणि गोवा सोलापूर अशी विमानसेवा सुरु धाली असली तरी, पुढच्या काळात सोलापूर ते मुंबई अशी देखील विमानसेवा सुरु करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (Kumar Ashirwad) यांनी दिली आहे.
मागील काही वर्षांपासून होटगी रोडवरील विमानतळ सुरू करण्यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या होत्या. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपामधील अनेक मंत्र्यांनी विमानसेवा सुरू करण्यासंदर्भातील आश्वासन दिले होते. केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही सोलापूरची विमानसेवा लवकर सुरू होईल असे सांगितले देखील होते. दरम्यान मध्यंतरी सोलापूर - गोवा, सोलापूर- मुंबई व सोलापूर - हैदराबाद या तिन्हीही मार्गावर विमानसेवा सुरू होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतरआता सोलापूर ते गोवा ही विमानसेवा 26 मे पासून सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
व्यवसाय निमित्ताने सोलापूर ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक
व्यवसाय निमित्ताने सोलापूर ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. अशा परिस्थितीत सोलापूर ते गोवा यादरम्यान विमान सेवा सुरू झाली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली होती. दरम्यान, याच मागणीच्या अनुषंगाने मध्यंतरी सोलापूरहून तीन महत्त्वाच्या शहरांसाठी विमान सेवा सुरू केली जाईल अशी माहिती समोर आली होती. यामुळे सोलापूरकरांच्या माध्यमातून सातत्याने या विमानसेवेच्या बाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान आता याच संदर्भात एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सगळ्यात आधी सोलापूर ते गोवा यादरम्यान विमान सेवा सुरू केली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या: