एक्स्प्लोर

Solapur Fire: सोलापूर एमआयडीसीतील टॉवेल कारखान्याला भीषण आग, तिघांचा मृत्यू, कंपनीचा मालकही आत अडकून पडला

Solapur News: सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत भीषण आग, तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीच्या प्रचंड ज्वाला आकाशात दिसत होत्या, एमआयडीसीत प्रचंड गोंधळ

Solapur Fire: सोलापूर शहरातील अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील एका कारखान्याला शनिवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागल्याची घटना घडली. रविवारी सकाळी उजाडल्यानंतरही ही आग धुमसतच आहे. त्यामुळे आता ही आग विझवण्यासाठी आजुबाजूच्या अग्निशमन केंद्रांवरील बंब याठिकाणी दाखल झाले आहेत. दरम्यान, काल रात्री अग्निशमन दलाने (Fire Birgade) या कारखान्यातून तीन जणांना बाहेर काढले. हे तिघेही आगीने (Solpaur Fire) होरपळल्यामुळे गंभीररित्या जखमी झाले होते. या तिघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मात्र, कंपनीचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय अजूनही कंपनीच्या आतच अडकून पडले आहेत. आगीची भीषणता  पाहता त्यांच्या वाचण्याची शक्यता कितपत आहे, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

एमआयडीसीतील सेंट्रल टेक्सटाइल मिल या कारखान्यात शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. या कारखान्यात टॉवेल तयार करण्याचे काम केले जायचे. टॉवेल तयार करण्याचे साहित्य कारखान्यात असल्याने आग वेगाने पसरत गेली. या टेक्स्टाईल मिलचे मालक स्मानभाई मन्सूरी (वय 78) आपल्या कुटुंबीयांसह कारखान्याच्या परिसरातच वास्तव्याल होते. कारखान्याचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय हे अद्यापही कारखान्यात अडकलेले आहेत. उस्मानभाई मन्सूरी (वय 78), अनस मन्सूरी (वय 24), शिफा मन्सूरी (वय 23), चिमुकला युसूफ मन्सूरी (वय 1) हे चौघेजण अद्याप आत अडकलेले आहेत. मन्सूरी यांच्या नातेवाईकांनी अग्निशमन दल उशीरा आल्याचा आरोप केला. अग्निशमन दल लवकर आले असते तर सगळ्यांचा जीव वाचला असता. अग्निशमन दलाकडे कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध नव्हती, असेही नातेवाईकांनी म्हटले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Solapur Fire news: अग्निशमन दलाचे अधिकारी काय म्हणाले?

साधारण चार वाजताचा सुमारास अग्निशमन दलाला माहिती मिळाली. त्यानंतर एमआयडीसी अग्निशमन दलातील गाडी तात्काळ या ठिकाणी पाचरण करण्यात आली. आगीचे स्वरूप पाहून सोलापूर महानगरपालिकेतील सर्व गाड्या त्याशिवाय अक्कलकोट पंढरपूर चिंचवड एमआयडीसी एनटीपीसी या ठिकाणावरून देखील पाण्याचे बंब मागवण्यात आले आहेत. कारखान्यामध्ये साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आज जाण्यासाठी कोणतीही जागा नाही. साईड मार्जिन नसल्याने आग विझवताना अडचण येत असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अग्निशमन दलाने तीन लोकांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. स्थानिकांच्या माहितीनुसार अजून चार लोक आतमध्ये अडकले आहेत. या लोकांना बाहेर काढण्यासाठी मिळेल त्या ठिकाणावरून आणि आज जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आग भिजवताना दोन फायरमॅन किरकोळ जखमी झाले आहेत. आग मोठी असल्याने जवळपास आणखी दोन तास विजवण्यासाठी लागू शकतात, असेही अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

 Solapur Akkalkot MIDC: सोलापूर एमआयडीसीत नेमकं काय घडलं?

शनिवारी पहाटे साधारण तीनच्या सुमारास टॉवेल कारखान्यातून धुराचे लोट बाहेर पडू लागल्यानंतर एमआयडीसी परिसरात मोठा गोंधळ उडाला. परिसरातील काही लोकांनी 108 या क्रमांकावर फोन करत दुर्घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुंभारी सब सेंटर, मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सोलापूर जिल्हा रुग्णालय या ठिकाणाहून शासकीय रुग्णवाहिका रवाना झाल्या. यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी येत आग विझवण्यास सुरुवात केली. घटनास्थळी मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. जेसीबी आणि अन्य वाहनांची मदत घेऊन कंपनीचा काही भाग पाडण्यात आला. अद्याप आग पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. तसेच कंपनीचे मालक आणि त्यांच्या कुटुंबीयांचाही पत्ता लागलेला नाही.

आणखी वाचा

PHOTO: सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत भीषण आग, तीन कामगारांचा होरपळून मृत्यू

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांचं आंदोलन मनोज जरांगे स्टाईल अन् नौटंकी; भाजप आमदाराची टीका, अन्नत्याग उपोषणाची उडवली खिल्ली
रोहित पवारांचं आंदोलन मनोज जरांगे स्टाईल अन् नौटंकी; भाजप आमदाराची टीका, अन्नत्याग उपोषणाची उडवली खिल्ली
सोलापुरात भाजपला पाठिंबा, राष्ट्रवादीच्या तीन आमदारांवर कारवाई? प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे काय म्हणाले
सोलापुरात भाजपला पाठिंबा, राष्ट्रवादीच्या तीन आमदारांवर कारवाई? प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे काय म्हणाले
Rohit Pawar: रोहित पवारांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, प्रकृती खालावली, साखरेची पातळी घटली; तरीही भूमिकेवर ठाम, म्हणाले...
रोहित पवारांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, प्रकृती खालावली, साखरेची पातळी घटली; तरीही भूमिकेवर ठाम, म्हणाले...
Rohit Pawar Protest : रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी....',
रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय',

व्हिडीओ

Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Trinamool Congress Crisis: तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार बंगाल भाजप प्रभारींच्या घरी पोहोचले; उद्या लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार
तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार बंगाल भाजप प्रभारींच्या घरी पोहोचले; उद्या लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार
Womens T-20 World Cup: महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध आज नवव्यांदा भिडणार
महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध आज नवव्यांदा भिडणार
Bihar Police Recruitment Exam: बिहार पोलीस भरती परीक्षेत तुफानी राडा, पाटलीपुत्र स्थानकावर दगडफेक आणि तोडफोड, रेल्वेगाड्या थांबवल्या; पोलिसांचा थेट गोळीबार
बिहार पोलीस भरती परीक्षेत तुफानी राडा, पाटलीपुत्र स्थानकावर दगडफेक आणि तोडफोड, रेल्वेगाड्या थांबवल्या; पोलिसांचा थेट गोळीबार
रोहित पवारांचं आंदोलन मनोज जरांगे स्टाईल अन् नौटंकी; भाजप आमदाराची टीका, अन्नत्याग उपोषणाची उडवली खिल्ली
रोहित पवारांचं आंदोलन मनोज जरांगे स्टाईल अन् नौटंकी; भाजप आमदाराची टीका, अन्नत्याग उपोषणाची उडवली खिल्ली
BJP : सांगली सातारा विधानपरिषदेत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा प्लॅन, सांगली महापालिकेचे नगरसेवक अज्ञातस्थळी, एसी बसमधून सहलीला रवाना
सांगली सातारा विधानपरिषदेत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा प्लॅन, सांगली महापालिकेचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना
Rahul Gandhi on PM Modi: तीन भारतीय नौसैनिकांच्या हत्येनंतरही कोणता खेद नाही, माफी नाही; उलट, अमेरिका आदेश देत आहे, आज्ञाधारक पीएम नोकराप्रमाणे ऐकतात आणि आदेश पाळतात, राहुल गांधीचा बोचरा वार
तीन भारतीय नौसैनिकांच्या हत्येनंतरही कोणता खेद नाही, माफी नाही; उलट, अमेरिका आदेश देत आहे, आज्ञाधारक पीएम नोकराप्रमाणे ऐकतात आणि आदेश पाळतात, राहुल गांधीचा बोचरा वार
रत्नागिरीत समुद्रकिनारी आढळला दुर्मिळ पक्षी; ब्राऊन बूबी पाहून पर्यटकही सुखावले, फोटोही काढले
रत्नागिरीत समुद्रकिनारी आढळला दुर्मिळ पक्षी; ब्राऊन बूबी पाहून पर्यटकही सुखावले, फोटोही काढले
Ram Mandir: राम मंदिरातील पुजाऱ्यांना नेमका किती पगार मिळतो? एकाने शेणाच्या ढिगात लपवलेले 10 लाख सापडले! 7 कोटींच्या चोरीची चर्चा, सीएम योगींनी कोणता निर्णय घेतला?
राम मंदिरातील पुजाऱ्यांना नेमका किती पगार मिळतो? एकाने शेणाच्या ढिगात लपवलेले 10 लाख सापडले! 7 कोटींच्या चोरीची चर्चा, सीएम योगींनी कोणता निर्णय घेतला?
Embed widget