एक्स्प्लोर

Solapur Crime News: मनीषाच्या एका ई-मेलमुळे डॉ. शिरीष वळसंगकर टोकाचं पाऊल उचलणं अशक्य; तिच्यावर दोन मुलांची जबाबदारी अन्..., आरोपीच्या वकिलांनी नेमकं काय म्हटलं?

Solapur Crime News: मनीषाने पाठवलेल्या एका मेलमुळे डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या करतील असे दिसून येत नाही, तिची व्यथा तिने मेलमध्ये मांडल्याचं आरोपीच्या वकिलांनी म्हटलं आहे.

सोलापूर: सोलापुरातील प्रख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा मानेच्या जामीनासाठी सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. आरोपी मनीषा माने हिने वकील प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. आज हा अर्ज न्यायालयसमोर येईल आणि त्यानंतर त्यावर सरकारी पक्षाचे म्हणणे मागवले जाईल. सरकारी पक्षाचे म्हणणे आल्यानंतरच या जामीन अर्जावर सुनावणी होईल. आरोपी मनीषा माने सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलिसांनी आरोपीकडून हवा असलेला तपास आणि चौकशी केली आहे. त्यामुळे अधिक न्यायालयीन कोठडीची आवश्यकता नसून आरोपीला जामीन मंजूर करण्याची आरोपीच्या वकिलांची मागणी आहे. त्यामुळे बहुचर्चित असलेल्या या प्रकरणातील महिला आरोपी मनीषा माने यांना जामीन मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे, अशातच मनीषाने पाठवलेल्या एका मेलमुळे डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या करतील असे दिसून येत नाही, तिची व्यथा तिने मेलमध्ये मांडल्याचं आरोपीच्या वकिलांनी म्हटलं आहे. 

एका मेलमुळे ते आत्महत्या करतील असे दिसून येत नाही

प्रख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर मनीषाने पाठवलेल्या त्या एका मेलमुळे ते आत्महत्या करतील असे दिसून येत नाही. 'त्या' मेलमध्ये तिने तिची व्यथा मांडली आहे. या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे असं म्हणत सोमवारी यासह अनेक मुद्यांवर आपण मनीषा मानेच्या जामिनासाठी अर्ज करणार असल्याची भूमिका आरोपीच्या वकिलांनी स्पष्ट केली आहे. डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा पोलिस कोठडीनंतर सध्या 9 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. मनीषाला यापूर्वी पाच दिवस पोलिस कोठडी सुनावलेली आहे, त्यामुळे तिच्यापुरता प्राथमिक तपास संपलेला असल्याचे दिसून येते. तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही. दोन मुलांची जबाबदारी तिच्यावरती आहे. यापूर्वी पोलिस तपासात सहकार्य केले होते. भविष्यातही ती सहकार्य करेल, असंही आरोपी मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी स्पष्ट केलं आहे.

वळसंगकरांच्या आत्महत्या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे. एका महिलेस खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्यात आले आहे. सदर हॉस्पिटलमध्ये सन 2008 पासून सेवा बजावत आली आहे. गुन्हा दाखल होईपर्यंत फिर्यादी अथवा कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून कोणतेही आरोप केले गेले नव्हते. आरोपांप्रमाणे मनीषा त्रासदायक होती तर तिला जबाबदारी दिली नसती. तिला त्याच वेळी नोकरीवरून कमी केले असते अथवा तिच्याविरुद्ध तक्रारी झाल्या असत्या, असेही आरोपींच्या वकिलांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?

व्हिडीओ

Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
बॉलिवूडपासून दूर गेलेला इमरान खान, पण त्याच्या सावत्र वडील कोण माहितीय? ओळख ऐकून व्हाल थक्क
बॉलिवूडपासून दूर गेलेला इमरान खान, पण त्याच्या सावत्र वडील कोण माहितीय? ओळख ऐकून व्हाल थक्क
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
Embed widget