एक्स्प्लोर

Siddharam Mhetre : शिंदेसाहेब मला म्हणाले, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी; काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत, अक्कलकोटमध्ये पक्षप्रवेश

Siddharam Mhetre Join Shiv Sena : दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे. त्यामुळे आपण शिवसेनेत जात असल्याचं माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले. 

सोलापूर : अक्कलकोटचे माजी आमदार आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेसला रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अक्कलकोटमध्ये त्यांनी हा प्रवेश केला. मध्यप्रदेशच्या लोकांनीही आपल्याला शिंदेंसाहेबांसोबत जा असं सांगितलं, त्यामुळेच शिवसेनेत जाण्याचं निश्चित केल्याचं सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगितलं. तसेच तू भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी असल्याचं शिंदे आपल्याला म्हणाले असंही त्यांनी सांगितलं. 

जिल्हात आमचे एकमेव घराणे आहे ज्याने कधीच पक्ष बदलला नव्हता. ही स्वामींची नगरी, स्वामी देखील म्हणतात, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. तसंच मला एकनाथ शिंदे म्हणाले, भिऊ नको तुझ्या पाठीशी आहे. दिलेला शब्द पाळणारा हा आमचा नेता, त्यामुळे मी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला असं सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले. 

Siddharam Mhetre : उज्जैन महाकालच्या लोकांचाही शिंदेंसोबत जाण्याचा सल्ला

सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की, डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या मुलाचा कार्यक्रम होता. पण ते सोडून साहेब आमच्यासाठी आलेत. 1957 पासून आम्ही काँग्रेस सोबत होतो. विधानसभा निवडणुकीत मला एक लाख लोकांनी मतदान केलं. त्यानंतर मी राज्यभर चौकशी केली, मध्य प्रदेशच्या लोकांनीही मला शिंदेंसोबत जायला सांगितलं. उज्जैन महाकालेश्वरला आमचे लोक गेले होते. तिथं त्यांनी अनेकांना विचारलं. तेव्हा त्यांनाही सांगितलं गेलं की शिंदेसाहेबांसोबत जा. 

सकाळी 11 पासून इथं लोकं बसलेत. पण तुम्ही अजून दोन तास जरी उशीर झाला असता तरी आम्ही असेल बसलो असतो असं एकनाथ शिंदे यांना उद्देशून सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले. ते म्हणाले की, "अनेकांची इच्छा होती की एकनाथ शिंदे या कार्यक्रमला येऊ नयेत. हा कार्यक्रम होऊ नये. आम्ही कधीच कोणाचे वाईट चिंतत नाही. मागच्या 40 वर्षात कधीच लोकांना पैसे देऊन आणले नाही. पैसे दिले की दोन तासात लोक उठून जातात. पण तुम्ही दहा तासांपासून इथे बसून आहात. मी तुमच्यासमोर नतमस्तक होतो."

Siddharam Mhetre Join Shiv Sena : अक्कलकोटच्या विकासासाठी निधी द्या

सिद्धाराम म्हेत्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे अक्कलकोटच्या विकासासाठी मदत करावी अशी मागणी केली. ते म्हणाले की, "अक्कलकोट तालुका कर्नाटक सीमेवर असलेला तालुका, अनेकांची बोलीभाषा कन्नड आहे. पण या ठिकाणचे सिंचन योजनेचे काम निधी अभावी थांबलेलं आहे. तेवढा निधी आम्हाला द्यावी ही विनंती. अक्कलकोट नगरपालिका क वर्गातील आहे. त्यामुळे नगरपालिकेला 100 कोटी रुपये देण्यात यावेत.  उजनी प्रमाणे कुरनूर धरणावर पर्यटन व्हावे ही आमची मागणी आहे. अक्कलकोटला एमआयडीसी मंजूर व्हावी ही विनंती आहे. बोरमणी विमानतळ दहा वर्षांपूर्वी मंजूर झालं आहे. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात."

 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shahaji Bapu Patil: गणेश नाईक कद्रू मनाचा अन् अल्पसंतुष्ट माणूस, शरद पवारांच्या मदतीने महायुतीचे सरकार पाडायचाही प्रयत्न; शहाजी बापूंची घणाघाती टीका
गणेश नाईक कद्रू मनाचा अन् अल्पसंतुष्ट माणूस, शरद पवारांच्या मदतीने महायुतीचे सरकार पाडायचाही प्रयत्न; शहाजी बापूंची घणाघाती टीका
Tandulwadi Accident: तांदूळवाडीत रस्त्याला लागूनच 3 धोकादायक विहिरी, आठ जणांचा बळी गेल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर, जबाबदार कोण?
तांदूळवाडीत रस्त्याला लागूनच 3 धोकादायक विहिरी, आठ जणांचा बळी गेल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर, जबाबदार कोण?
Pandharpur Accident 8 death : आजारी असलेल्या सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन देवदर्शन, घरी येण्यापूर्वी फोन केला अन् परत येताना घात झाला, पंढरपूरच्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत
आजारी असलेल्या सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन देवदर्शन, घरी येण्यापूर्वी फोन केला अन् परत येताना घात झाला, पंढरपूरच्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत
Tandulwadi Accident: 10 वर्षांपूर्वी 6 कलाकारांचा बळी, आता 8 जणांना गिळलं; तांदुळवाडीतील 'ती' विहीर ठरतेय मृत्यूचा सापळा, 'त्या' दुर्दैवी आठवणी झाल्या ताज्या
10 वर्षांपूर्वी 6 कलाकारांचा बळी, आता 8 जणांना गिळलं; तांदुळवाडीतील 'ती' विहीर ठरतेय मृत्यूचा सापळा, 'त्या' दुर्दैवी आठवणी झाल्या ताज्या

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Sanjay Raut Delhi: आई,साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेतली; खासदारांनी ठाकरेंना शब्द दिल्याचा दावा
TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report
Eknath Shinde Vs Ganesh Naik : नाईक Vs शिंदे, पत्रिकेवरून नवा संघर्ष! | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanchita Ugale Co Star Ujjawal Sharma: लिव्ह-इनमध्ये होती संचिता उगले? को-अॅक्टरनं कुणालाही माहीत नव्हतं 'ते' सांगितलं, म्हणाला, 'ती Ex मुळे टेन्शनमध्ये होती...'
लिव्ह-इनमध्ये होती संचिता उगले? को-अॅक्टरनं कुणालाही माहीत नव्हतं 'ते' सांगितलं, म्हणाला, 'ती Ex मुळे टेन्शनमध्ये होती...'
कर्जमाफीसाठी आंदोलक शेतकऱ्याने लाखमोलाची दुचाकी पेटवली; यापुढे मंत्र्यांच्या गाड्या जाळू, आंदोलकांचा इशारा
कर्जमाफीसाठी आंदोलक शेतकऱ्याने लाखमोलाची दुचाकी पेटवली; यापुढे मंत्र्यांच्या गाड्या जाळू, आंदोलकांचा इशारा
Aanchal Mamidwar : मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
Omraje Nimbalkar: पवनराजे निंबाळकर खटला, निकालाची तारीख पुन्हा पुढे ढकलली; खासदार ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया
पवनराजे निंबाळकर खटला, निकालाची तारीख पुन्हा पुढे ढकलली; खासदार ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया
Prakash Mahajan : भाजपच्या झाडावर बसलेत म्हणून वनमंत्री गणेश नाईकांचे माकड चाळे, प्रकाश महाजन भडकले; म्हणाले, आयुक्तांना नोटीस बजावायलाच हवी...
भाजपच्या झाडावर बसलेत म्हणून वनमंत्री गणेश नाईकांचे माकड चाळे, प्रकाश महाजन भडकले; म्हणाले, आयुक्तांना नोटीस बजावायलाच हवी...
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
Nashik Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
Tukaram Mundhe FDA: भेसळखोरांमध्ये तुकाराम मुंढेंची दहशत, एफडीएच्या कारवाईच्या भीतीने सगळ्या पेप्सी रस्त्यावर फेकून दिल्या
भेसळखोरांमध्ये तुकाराम मुंढेंची दहशत, एफडीएच्या कारवाईच्या भीतीने सगळ्या पेप्सी रस्त्यावर फेकून दिल्या
Embed widget